| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ ऑगस्ट २०२४
सकल संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांचा 674 वा संजीवन समाधी सोहळा श्री नामदेव मंदिर करणा चौकी सांगली येथे मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. या सप्ताहामध्ये पारायण, कीर्तन, प्रवचन, भजन दीपोत्सव असेव मंगलमय कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी ह. भ. प. बाळकृष्ण विठ्ठल मुळे यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर पालखी सोहळा पार पडला. शहरातील गणपती पेठ, कापड पेठ, मेल रोड, गणपती मंदिर, गवळी गल्ली या प्रमुख मार्गावरून पालखी नामदेव मंदिर येथे आणण्यात आली. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सिद्धू कान्हेरी, अविनाश पोरे, धनंजय होमकर, बाळासाहेब वेल्हाळ, किरण बोंगाळे, मधुकर बारटक्के, रवींद्र वादवणे, गजानन मुळे, उदय मुळे, श्रीमती स्वाती पिसे, विजय मुळे, स्वाती मुळे, शारदा काळेबेरे, वर्षा कोपर्डे, निर्मला पिसे, माधुरी पतंगे, सोनाली रेवेकर या प्रमुख मान्यवरांसह सांगली व परिसरातील शेकडो नामदेव भक्त उपस्थित होते.
पंढरीच्या वारी प्रमाणेच कोणताही गाजावाजा न करता, गडबड गोंधळ न होता, अत्यंत शिस्तबद्ध रीतीने श्री नामदेव महाराजांचा 674 वा संजीवन समाधी सोहळ्याचा हा कार्यक्रम संपन्न झाला. याबद्दल संयोजकांचे आणि भक्त बंधू भगिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.