Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत 13 ऑगस्ट रोजी बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार विरोधात निषेध सभा !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ ऑगस्ट २०२४
पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकल्यानंतर बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर हिंदू समाजावर अत्याचार केले जात आहेत तेथील मंदिरे आणि हिंदूंची घरे उद्ध्वस्त केले जात आहेत. याचा संपूर्ण भारतातून निषेध व्यक्त केला जात आहे. आता सांगलीतही अशाच पद्धतीने हिंदू एकटा आंदोलनाच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, बांगलादेशी हिंदू आपले धर्म बांधव असल्यामुळे प्रत्येक हिंदूंचे धर्म कर्तव्य आहे की या निषेध सभेला मोठ्या प्रमाणे उपस्थित राहून, बांगलादेशातील अत्याचार विरोधात आपला उद्वेग व्यक्त करणे गरजेचे आहे.


या निषेध सभेत मांडण्यात येणारे मुद्दे

बांगलादेशात हिंदू महिलावर आत्याचार करून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा निषेध.

हिंदू मंदिरावर हल्ले करून देवाची विटंबना करून तोडफोड निषेध.

भारत सरकारने हस्तक्षेप करून बांगलादेशी हिंदूना संरक्षण देण्यात यावे.

भारतात घुसखोरी केलेले बांगलादेशी लोकांना हुडकून तात्काळ बंगलादेशी परत पाठवा.

बांगलादेशांतील पीडित हिंदूना तात्काळ भारतात आश्रय द्यावा.

भारताने बांगलादेश मधील हिंसाचार प्रकणात हस्तक्षेप करावा.