Sangli Samachar

The Janshakti News

दत्तनगर श्री 1008 शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरातर्फे श्री. भालचंद्र पाटील यांचा सत्कार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ ऑगस्ट २०२४
दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी जबाबदारी सर्वांनी माझ्याकडे ज्या विश्वासाने सोपवले आहे त्या विश्वासाला कोणताही तडा न जाऊ देता त्या पदाला न्याय देऊन जबाबदारी पार पाडणार असल्याचे प्रतिपादन श्री भालचंद्र वीरेंद्र पाटील यांनी केले.
श्री. भालचंद्र वीरेंद्र पाटील यांची दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री 1008 शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर दत्तनगर येथील ट्रस्ट व श्रावक-श्राविकांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.


यावेळी बोलताना श्री भालचंद्र पाटील म्हणाले की दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी माझी अनपेक्षितरित्या निवड झाली. यापूर्वी सभेच्या कामकाजामध्ये काम करण्यासाठी, सभेचे माजी अध्यक्ष स्व रावसाहेब दादा पाटील यांनी प्रोत्साहन दिले होते. सभेच्या सर्व कामकाजामध्ये काम करण्याची संधी दिली होती. नुकतेच सांगलीमध्ये पार पडलेले दक्षिण भारत जनसभेचे अधिवेशन खूपच चांगल्या प्रकारे पार पाडता आले, असे सांगून ते म्हणाले की ग्रामीण भागामधील समाजातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या होतकर, हुशार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आरोग्य विषयक बाबींकडे आपण लक्ष देणार आहोत परंतु सभेचे कामकाज नेटाने करण्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी सरळ हस्ते सभेला आर्थिक मदत करणे आवश्यक आहे असेही असे भालचंद्र पाटील म्हणाले. दत्तनगर येथील श्री 1008 शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरास सर्वतोपरी सहकार्य राहील अशी गवाही त्यांनी यावेळी दिली.

श्री. भालचंद्र पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या सत्कार समारंभाच्या वेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अजयकुमार कारंजी, उपाध्यक्ष सुभाष उदगावे, सचिव अशोक सरडे, खजिनदार सुनील अष्टेकर, विश्वस्त सुनील मानकापुरे, डॉ. संजय किनिंगे, एस. के. पाटील व मगदूम सर उपस्थित होते.