yuva MAharashtra शालेय परीक्षेत नव्हे, तर जीवनाच्या कसोटीत माणसाने उत्तीर्ण होणे हा शिक्षणाचा खरा अर्थ आहे - ना. नितीन गडकरी

शालेय परीक्षेत नव्हे, तर जीवनाच्या कसोटीत माणसाने उत्तीर्ण होणे हा शिक्षणाचा खरा अर्थ आहे - ना. नितीन गडकरी


| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. १४ जुलै २०२४
आपल्या रोखठोक आणि खास शैलीतील भाषणामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच सर्वच मीडियातील चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. म्हणूनच ते जे बोलतील त्याचे तात्काळ बातमी होते. नुकतेच त्याने नागपूर येथे विद्यार्थ्यांच्या पुरस्कर वितरण समारंभात बोलताना 'व्हीआयपी संस्कृती आणि देशातील शिक्षण व्यवस्थेवर रोखठोक भाष्य केले.

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की "आजची देशाची शिक्षण व्यवस्था म्हणजे जिथे शाळा आहे तिथे शिक्षक नाही, जिथे शिक्षक आहे तिथे इमारत नाही आणि जिथे दोन्ही आहे तिथे विद्यार्थी नाहीत तर जिथे तिन्ही आहेत तिथे शिक्षण नाही !" सध्या केंद्रात आणि राज्यात भाजप पुरस्कृत सरकारी आहेत. त्यामुळे त्यांचे हेच वाक्य चांगलेच चर्चेत आले आहे.


दहावीत मेरिटमध्ये येणे बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे किंवा उच्च शिक्षित होऊन नोकरी व्यवसायात येणे किंवा डॉक्टर इंजिनियर होणे म्हणजे शिक्षण नव्हे. तर सर्वात मोठी परीक्षा असते ती जीवनाच्या कसोटीची. या कसोटीत तुम्ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालात, तरच तुम्ही सुशिक्षित झालात. मूल्यांसह ज्ञान यामुळे व्यक्ती समृद्ध म्हणते. कोणीही कोणाकडूनही सन्मानाची मागणी करू नये, ती स्वकष्टाने मिळवता आली पाहिजे.

यावेळी बोलताना ना. नितीन गडकरी यांनी आपला अनुभव सांगताना म्हणाले की, 'ज्यावेळी मी कोणीही नव्हतो त्यावेळी मला न्यायला विमानतळावर कुत्रेही यायचे नाही. आणि आता मी विमानतळावर पोहोचल्यानंतर पहिला तिथे कुत्री येतात. कारण मी झेड प्लस सुरक्षा यंत्रणेच्या कवचामध्ये आहे. मी विमानतळावर येण्यापूर्वी कुत्रा तिथे चक्कर टाकतो तेव्हा त्याला मी म्हणतो की बाबा रे तुझ्याकडे दुसरा काही कामधंदा नाही का माझ्याकडे येऊ नकोस." ना. नितीन गडकरी यांच्या या विधानानंतर सभागृहात हास्याचे कारंजे फुलले.