yuva MAharashtra पूरग्रस्त कुटुंबास तीस हजार रुपयांची आर्थिक मदत करावी : उत्तमराव कांबळे

पूरग्रस्त कुटुंबास तीस हजार रुपयांची आर्थिक मदत करावी : उत्तमराव कांबळे


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ जुलै २०२४
महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस झाल्याने ठिकठिकाणी नद्यांना पूर आला आहे. या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसून त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या पुराचा फटका नागरिकांना बसला आहे. तरी पूरग्रस्त नागरिकांच्या घराचा पंचनामा तातडीने करुन प्रत्येक कुटुंबास रुपये तीस हजार ची आर्थिक मदत करावी व प्रत्येक कुटुंबास गहू 30 किलो, तांदूळ ३० किलो व एक गॅस सिलेंडर मोफत देण्यात यावे.


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना सांगलीचे उपजिल्हाधिकारी {महसूल}, माननीय श्री.राजीव शिंदे यांचे मार्फत प्रत्यक्ष भेटून वरील मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. सदरचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री उत्तमराव कांबळे (आबा)यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी समाज कल्याण सभापती माननीय विद्याताई कांबळे, भारत चौगुले, शितल खाडे, अभिजीत रांजणे, सुरेखा हेगडे, सुरेखा सातपुते, रुपेंद्र जावळे, आदर्श कांबळे, सुजल कट्टे, प्रविण चौगुले, समशेर चौगुले, दिपक हाटे, आशाताई पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.