yuva MAharashtra '११२ हेल्पलाइन'ला गेला एक कॉल, अन् आत्महत्या करणाऱ्याचा वाचला जीव !

'११२ हेल्पलाइन'ला गेला एक कॉल, अन् आत्महत्या करणाऱ्याचा वाचला जीव !


| सांगली समाचार वृत्त |
शिराळा - दि. २२ जुलै २०२४
'112 जनताजनार्दनी संकटसमई साद घालण्याकरिता पोलिसांनी सुरू केलेली हेल्पलाइन... आजपर्यंत शेकरू नव्हे तर लाखो लोकांनी या हेल्पलाईनचा वापर केल्याने, त्यांना पोलिसांची मदत मिळाली होती. पण काल या हेल्पलाइनचा वापर केल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले.

घटना तालुक्यातील कांदे गावची... भीम नगर मध्ये आशिष जगन्नाथ शिवजातक कुटुंबीयांसह राहतात. आपली पत्नी मोनिका हिच्याशी त्यांचे भांडणे व्हायची. याला कंटाळून, त्या आपल्या सहा महिन्याच्या मुलासह गुरुवारी ( दि. १८) मोहरे ( ता. पन्हाळा) येथील माहेरी निघून गेलेल्या. उपरती झालेल्या आशिष वारंवार त्यांना फोन करून परत बोलावत होता. परंतु मोनिका यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी शुक्रवारी आशिष याने 'मी आत्महत्या करीत आहे.' असा फोन केला.


घाबरलेल्या मोनिका यांनी तात्काळ 112 हेल्पलाइनवर फोन केला आणि त्यांनी, " माझे पती आत्महत्या करीत आहेत त्यांना वाचवा !" अशी साद घातली. पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या सोचनेनुसार हवालदार सूर्यकांत कुंभार, व अरुण मामलेदार यांच्यासह आशिष शिवजातक यांच्या घरी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी शंका आल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा अशी साडीने गळफास लावल्याच्या स्थितीत आढळून आला. पोलिसाने त्याला तात्काळ खाली उतरवले व बेशुद्ध अवस्थेतील आशिषला शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

'११२ एक हेल्पलाइन' मुळे आशिषचा जीव वाचल्याने, त्याचे नातेवाईक व नागरिकाकडून पोलिसांचे कौतुक करीत आहेत.