yuva MAharashtra पंढरीच्या वारीतील सांगलीतून धावणारी पहिली रेल्वे संस्मरणीय ठरणार !

पंढरीच्या वारीतील सांगलीतून धावणारी पहिली रेल्वे संस्मरणीय ठरणार !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ जुलै २०२४
आषाढी असो की कार्तिकी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची मोठी मांदियाळी असते. या वारीला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबरच इतर उपलब्ध वाहनाने जाणारे वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये पायी वारी बरोबरच रेल्वेला प्रथम प्राधान्य दिले जातात. सांगलीहून पंढरपूरला जाणारी देवाची गाडी याचसाठी प्रसिद्ध होती. पण मिरज कुर्डूवाडी नॅरो गेज रेल्वे मार्ग समध्ये बदलल्यानंतर ही देवाची गाडी बंद झाली आणि रेल्वे घेतला. परंतु सांगलीतून पंढरपूरला जाण्यासाठी थेट रेल्वे नव्हती. मात्र आता ही सोय झाल्याने विठू भक्तामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

काही महिन्यापूर्वीच सांगली - परळी एक्सप्रेस नव्याने सुरू करण्यात आली आहे या रेल्वेची यंदाची ही पहिलीच आषाढी वारी असल्याने ती संस्मरणीय करण्यासाठी वारकरी समुदायाने आषाढीच्या पुऱ्या सभेला स्थान व अभंगाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. सांगली व परिसरातील वारकऱ्यांसाठी सांगली रेल्वे स्थानकावरून दररोज धावणारी ही सांगली परळी एक्सप्रेस पहिल्या वारीचा आनंद देण्यासाठी सज्ज होत आहे. यासाठी विठ्ठल नामाच्या गजरात ती साजरी करण्याबाबत भक्तांना आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातून यंदा एक लाख विठ्ठल भक्तांनी सांगली स्टेशनवरून जून व जुलै महिन्यात सांगली ते पंढरपूर प्रवास करायचा असा निर्धार वारकरी समुदायातर्फे व्यक्त करण्यात आला आहे दररोज रात्री साडेआठ वाजता चांगली स्थानकातून ही गाडी सुटते या रेल्वेचा अवघा 65 रुपये आहे, त्यामुळे सर्वसामान्य विठू भक्तांना ही पर्वणीच ठरणार आहे.