Sangli Samachar

The Janshakti News

NDA विरुद्ध INDIA : कोणत्या बाजूला कोणते पक्ष ? कोणाची किती जागांवर आघाडी ?| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ५ जून २०२४
देशभरातील लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. जवळपास सर्व जागांचे कल समोर आले आहेत. तर काही जागांचे निकालही हाती आले आहेत. आतापर्यंत समोर आलेले कल पाहता सध्या भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

त्याचवेळी विरोधी इंडिया आघाडीनंही गेल्या लोकसभेच्या तुलनेच प्रचंड चांगली कामगिरी केली असल्याचं दिसून आलं. लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना करत आव्हान उभं केलं होतं. निवडणूक निकालांचे समोर आलेले आकडे पाहता, हा प्रयोग यशस्वी ठरल्याचंही स्पष्ट झालं आहे.

जनतेचा कौल आम्ही मान्य करतो असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. मित्र पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करुन आम्ही पुढची दिशा ठरवू असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला असला तरी, निवडणुकीत त्यांना पूर्णपणे बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळं त्यांना आता सरकार स्थापन करायचं असलं तरी ते आघाडीचं सरकारचं स्थापन करावं लागेल. त्यामुळं एनडीए आणि इंडिया या दोन्ही आघाडींमध्ये कोणकोणते प्रमुख पक्ष आहेत? आणि त्यांना निवडणुकीत किती जागी विजय किंवा आघाडी मिळाली आहे, हे आपण पाहुयात.

NDA महायुती

पक्ष आणि त्यांना मिळालेल्या एकूण जागा (कल+विजय)

भारतीय जनता पक्ष - 244
शिवसेना शिंदे गट - 6
राष्ट्रवादी अजित पवार गट - 1
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास पासवान) - 5
तेलुगू देसम पार्टी - 16
जनता दल (युनायटेड) - 14
जनता दल (धर्मनिरपेक्ष) - 2
अपना दल (सोनीलाल) - 1
सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा - 1
शिरोमणी अकाली दल (संयुक्त) - 1
(महत्त्वाचे पक्ष आणि त्यांची कामगिरी - स्त्रोत - eci)

INDIA आघाडी

इंडियन नॅशनल काँग्रेस - 98
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - 7
शिवसेना उद्धव ठाकरे गट - 10
समाजवादी पक्ष - 35
तृणमुल काँग्रेस - 29
द्रविड मुनेत्र कळघम - 22
राष्ट्रीय जनता दल - 4
माकप - 4
आम आदमी पार्टी - 3
इंडियन मुस्लीम लीग - 3
झारखंड मुक्ती मोर्चा - 3
जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स -2

वरील आकडे हे काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे यामध्ये आणखी काही उलटफेर होऊ शकतो.