Sangli Samachar

The Janshakti News

सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपा विरोधी बाकावर ? INDIA गेम फिरवणार का ?| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ५ जून २०२४
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात एनडीएला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 292 जागा जिंकल्या आहेत. एकट्या भाजपने 240 जागा जिंकल्या आहेत. मात्र, स्वबळावर बहुमत मिळवण्यात भाजपला अपयश आलं आहे. . केंद्रात सत्ता स्थापनेसाठी 272 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. तर I.N.D.I.A ला 234 जागा मिळाल्या आहेत आहेत. यानंतर आता त्यांनीही सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे.

तिसऱ्यांदा सरकार स्थापनेसाठी मोदी सरकारसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांचं सहकार्य आहे. स्वबळावर बहुमत मिळवण्यात भाजपला अपयश आलं आहे. सध्या टीडीपी अजूनही एनडीएचा भाग आहे. एनडीएच्या आजच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी चंद्राबाबू नायडूही दिल्लीत येत आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून देखील सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेण्यासाठी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न करत आहे.


ती साथ गरजेची 

सरकार स्थापन करायचं असल्यास इंडिया आघाडीला आणखी काही आकडे जोडण्याची गरज आहे. यासाठी नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू यांची साथ मिळवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूला 12 जागा जिंकता आल्या आहेत. तर, चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) 16 जागा जिंकल्या आहेत. अशात इंडिया आघाडीने या दोघांना सोबत घेऊन सरकार स्थापन केल्यास ते 262 जागा मिळवतील.

तर भाजपला फटका 
दुसरीकडे टीडीपी आणि नितीश कुमारांनी साथ सोडली तर भाजपच्या जागा कमी होऊन 264 वर येतील. अशात इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये सरकार स्थापनेसाठी काट्याची टक्करही पाहायला मिळू शकते. नितीशकुमार, ममता बॅनर्जी, नायडूंना सोबत घेऊन इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

इंडिया आघाडीकडून शरद पवार यांच्यावर नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दुसऱ्याकडी तेलंगणचे मुख्यमंत्री रेवन्त रेड्डी यांच्याकडे टीडीपीच्या चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी असून दोन्ही नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत.