Sangli Samachar

The Janshakti News

विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत शिंदे सेनचे एकला चलो रे !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ जून २०२४
२६ जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर निवडणुका शिंदे सेना स्वतंत्र लढणार आहे. शिंदेसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबई पदवीधर मधून माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, मुंबई शिक्षकमधून शिवाजी शेंडगे आणि कोकण पदवीधर मधून शिंदे सेनेचे सचिव संजय मोरे आज सकाळी कोकण भवन येथे आपला निवडणूक अर्ज सादर करणार आहेत.

यापूर्वी भाजपने मुंबई पदवीधर साठी किरण शेलार, मुंबई शिक्षक साठी शिवनाथ दराडे आणि कोकण पदवीधर साठी विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी जाहिर केली आहे. तर उद्धव सेनेने पदवीधरसाठी माजी मंत्री डॉ. अनिल परब, तर शिक्षक मधून ज. मो. अभ्यंकर यांची जाहीर केली आहे.


शिंदे सेनेच्या या भूमिकेमुळे राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमने घेतलेला हा निर्णय भाजपला एका अर्थाने इशारा असल्याचे मानले जात आहे.