yuva MAharashtra महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात आगामी 'विधानसभेची पेरणी'; कोण गरजणार, कोण बरसणार ?

महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात आगामी 'विधानसभेची पेरणी'; कोण गरजणार, कोण बरसणार ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ जून २०२४
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'कही खुशी कही गम' ही भावना बरोबर घेऊन, १० जून पासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन आता २७ जून पासून सुरू होणार आहे. हे पावसाळी अधिवेशन महायुती आणि महाआघाडी दोघांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

काल संपन्न झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील यशापयशाची आढावा घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करणारे निर्णय अर्थात 'पेरणी' बाबतची विचारविनिमय करण्यात आला. मान्सून ने राज्यात प्रवेश केला असला तरी दुष्काळी भागात अजूनही पाणीटंचाई आणि चारा टंचाई हे महत्त्वाचे ठरणारे विषय या अधिवेशनात अग्रस्थानी असतील हे निश्चित.

हे पावसाळी अधिवेशन जितके महायुतीसाठी महत्त्वाचे आहे तितकेच ते महाआघाडीसाठीही महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रासमोरील असलेले गंभीर प्रश्नावर महायुतीला घेण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. यामुळे पावसाळी अधिवेशनात सरकारतर्फे पटलावर येणा-या विषयात महायुतीला अडकवून महाआघाडीचा डंका कसा फिरता येईल याची 'पेरणी' नेत्यांकडून होण्या अपेक्षित आहे. 

आणि म्हणूनच हे पावसाळी अधिवेशन जनता जनार्दनापेक्षा आगामी विधानसभा निवडणूक कशी जिंकता येईल,  यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्या दृष्टीने महायुतीचे शासकीय विषय विषय तर महाआघाडीचे बिगर सरकारी विषय घेऊन हे अधिवेशन संपन्न करण्याची जबाबदारी महायुती आणि महाआघाडी या दोन्ही पातळीवर कशा पद्धतीने हाताळली जाते, यावरच महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनावर गडगडणारे ढग किती बरसतात हे ठरेल.