| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ जून २०२४
सांगली जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेमार्फत
दिनांक 8 जून 2024 रोजी असलेल्या महेश नवमी प्रित्यर्थ आयोजित साडी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी पारंपारिक वेशभूषा व भारतीय संस्कृतीची ओळख साडी वॉकेथॉन आयोजनाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला होता.
सर्व महिलांनी पिवळी साडी, लाल ओढणी परिधान करून प्रेरणा गीत व नारीशक्तीवर घोषणा देत सकाळच्या सुंदर वातावरणात वॉकेथॉन मध्ये भाग घेतला. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती लाभली ती, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सौ. मयुरी देशमुख गिल्डा, त्यांनी सर्व महिलांना आपल्या भारतीय संस्कृतीचे महत्त्व व जागरूकतेबद्दल उद्बोधन दिले.
महिला संघटन अध्यक्ष - आशा झंवर, सचिव - राखी मर्दा यांच्या समवेत कार्यक्रमांमध्ये स्थानिक व प्रदेश पदाधिकारी सरोज तोष्णीवाल, राजकमल मर्दा, हेमा मंत्री, पुनम सारडा यांची उपस्थिती लाभली. माधवनगर महिला मंडळ अध्यक्ष -रंजना बंग, महिला प्रगती मंडळ अध्यक्ष - प्रेमा गिल्डा इनरव्हील क्लबचे पदाधिकारी, सर्व समिती सदस्य उपस्थित होते. समारोप कार्यक्रमांमध्ये निमंत्रित DYSP प्रणील गिलडा उपस्थित होते. आरती व प्रसाद ने कार्यक्रमाची यशस्वीरित्या सांगता झाली .