Sangli Samachar

The Janshakti News

राणेंचा पत्ता कट! कोणाला संधी? कोणाला डच्चू? वाचा महाराष्ट्रातील संपूर्ण यादी !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ९ जून २०२४
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सत्ता स्थापनेसाठी नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिल्यानंतर आज राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान असतील. मोदींसह केंद्रीय मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी खासदारांना फोन करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांना दिल्लीत शपथविधीसाठी बोलावण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा समावेश असून यात तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.


महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि रामदास आठवले यांची पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. तर रक्षा खडसे आणि प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच संधी मिळालीय. पुण्याचे भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदाच लोकसभेत जात असून त्यांचीही थेट मंत्रिपदी वर्णी लागलीय. दुसऱ्या बाजूला राज्यातील दोन राज्यमंत्र्यांना मात्र मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलेलं नाही.

नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रीमंडळ स्थान दिले जाणार नाही. भाजप हायकमांड कडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रीमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले. नारायण राणे एमएसएमई मंत्री होते तर कराड अर्थ राज्यमंत्री होते. त्यांना यंदा मंत्रिमंडळात संधी नाही.

अमित शहा, मनसुख मांडविय, अश्विनी वैष्णव, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, जितेंद्र सिंग, शिवराज सिंह चौहान, हरदीप सिंग पुरी, एचडी कुमारस्वामी, चिराग पासवान, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, ज्योतिरादित्य सिंधीया, किरेन रिजिजू, गिरीराज सिंह, जयंत चौधरी, अन्नामलाई, मनोहरलाल खट्टर, सुरेश गोपी, जितन राम मांझी, रामनाथ ठाकुर, जी किशन रेड्डी, बंडी संजय, अर्जनु राम मेघवाल, प्रल्हाद जोशी, चंद्रशेखर चौधरी, चंद्रशेखर पेम्मसनी, राम मोहन नायडू किंजारापू, रवनीत सिंग बिट्टू, जितिन प्रसाद, पंकज चौधरी, बीएल वर्मा, ललन सिंग, सोनोवाल, अनुप्रिया पटेल, प्रतापराव जाधव, अन्नपुर्णा देवी, रक्षा खडसे, शोभा कारंदलजे, कमलजीत सेहरावत, राव इंद्रजीत सिंग, रामदास आठवले, हर्ष मल्होत्रा, सीआर पाटील.