Sangli Samachar

The Janshakti News

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्यामुळेच काशीचे पुनर्निर्माण झाले ! - आ. सुधीरदादा गाडगीळ !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जून २०२४
 'अयोध्या, मथुरा आणि काशी यांचा विध्वंस परकीय राजवटीने केला. त्यानंतर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी पुढाकार घेऊन जुन्या मंदिराशेजारी नवीन मंदिर बांधून श्री शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. तिथे नित्य पूजा-अर्चा चालवण्यासाठी योग्य ती सोय केली आणि काशीची पूज्य परंपरा अबाधित ठेवली. अन्यथा अयोध्येच्या श्रीराममंदिराची दुरवस्था झाली तशी काशीची अवस्था झाली असती. देशातील कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या काशीचे माहात्म्य पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी पुन्हा प्रस्थापित केले. राजमाता अहिल्यादेवींचे हे उपकार हिंदु समाज कधीच विसरणार नाही', असे विचार भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी येथे व्यक्त केले.


सांगली येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेस अभिवादन करतांना त्यांनी स्वत:चे मनोगत व्यक्त केले. या वेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे, सरचिटणीस विश्वजित पाटील, अविनाश मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.