| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जून २०२४
आज सांगली शरदचंद्र पवार संघटनेकडून सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका चे आयुक्त व प्रशासक करून अभिनंदन करण्यात आले. आयुक्त मा. शुभम गुप्ता साहेब यांनी आपल्या व्हीजिटिंग कार्ड च्या माध्यमातून सुरू केलेल्या ग्रीन उपक्रमाबद्दल हा सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी संघटनेचे शहरजिल्हाध्यक्ष डॉ शुभम जाधव म्हणाले की "आमचे नेते व राष्ट्रवादी काँगेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब, पक्षाचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमची विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांच्या विषयावर व प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवत असते, पण हे करत असताना पर्यावरण पूरक वृक्षारोपण सारखे अनेक सामाजिक उपक्रमही पक्षाकडून कायमच राबिवले जात असतात. त्यामुळे माननीय आयुक्त साहेब यांनी हाती घेतलेल्या आगळ्या वेगळ्या पर्यावरणपूरक उपक्रम हा नक्कीच शहराला चांगली दिशा दाखवणारा असेल त्याबद्दल आम्ही त्यांचा अभिनंदन पत्र व रोप देऊन आज सत्कार केला आहे. यावेळी विद्यार्थी शहरजिल्हाध्यक्ष डॉ शुभम जाधव, व्रजेश पडियार, दिग्विजय माळी, सागर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते