Sangli Samachar

The Janshakti News

सहा जणांना चिरडून माजी प्र कुलगुरूंचा कार अपघातात मृत्यू !| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. ४ जून २०२४
कोल्हापूरमध्ये आज भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. एका भरधाव कारने काही दुचाकीस्कारांवर गाडी घातली. कोल्हापूरच्या सायबर चौकात ही अपघाताची घटना घडली. या घटनेतील भरधाव कारने चक्क सहा जणांना चिरडलं. यापैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर आता आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अपघातात सहा जणांना चिरडणारी ती कार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कलुगुरुंची असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात त्यांचादेखील मृत्यू झालाय.

शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही. एम. चव्हाण यांच्या कारने कोल्हापूरच्या सायबर चौकात दुचाकींना धडक दिली. अतिशय भीषण हा अपघात होता. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. या अपघाताची दृश्य अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहेत.प्र कुलगुरूंची तब्येत बरी नव्हती

शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही एम चव्हाण यांची तब्येत बरी नव्हती. तरीदेखील त्यांनी कार चालवल्याची माहिती समोर येत आहे. प्र कुलगुरुंचा कार चालवत असताना कारवरील ताबा सुटला होता. त्यामुळे ही कार थेट दुचाकींवर जावून चढली. या गाडीने सहा जणांना अक्षरश: चिरडलं. अपघात इतका भीषण होता की, कार चालवणारे प्र कुलगुरु यांचादेखील यात मृत्यू झाला. या अपघातात एकूण 6 जण गंभीर जखमी झाले. तर 3 जणांचा मृत्यू झाला. पोलीस आता या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.