सांगली समाचार वृत्त |
इस्लामपूर - दि. २९ जून २०२४
माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे व मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरपोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकास इस्लामपूर विभागात पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पो.हे.कॉ. अरुण पाटील व पो.शि. सुरेश थोरात यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, राहुल माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार चोरीतील माल विक्री करण्यासाठी पेठ नाका येथील हायवे पुलाजवळ येणार आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील सदर पथकाने पेठ नाका येथील हायवेच्या पुलाच्या परिसरात सापळा लावून थांबले असता मोटारसायकल वरून एक इसम पुलाखाली येऊन थांबलेला दिसला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमास पळून जाण्याचे संधी न देता ताब्यात घेतले. त्याची चौकशी करत असताना त्याने आपले नाव प्रकाश माने वय वर्ष 30 मूळ राहणार उरण इस्लामपूर, सध्या दत्त वसाहत आष्टा, तालुका वाळवा असे सांगितले.
सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याची पंचायत समक्ष अंग ढडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये सोन्याची अंगठी, गंठण व सात हजार रुपये रोख असा ऐवज मिळून आला. तर मोटार सायकलीस अडकवलेल्या कापडी पिशवीत पंधरा साड्या मिळून आल्या. त्याच्याकडे मिळालेले सोन्याचे दागिने रोख रक्कम व साध्या बाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्याला विश्वासात घेऊन चौकशी करीत असताना हे सर्व काही दिवसापूर्वी सुरूल गावात एका घराचे लॉक तोडून चोरी केली असल्याची कबुली दिली.
तेव्हा इस्लामपूर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे घरपोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. यानंतर त्याच्याकडील सर्व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या राहुल प्रकाश माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये चोरी व घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून अधिक तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत.