Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत 'हिरामंडी नृत्य कार्यशाळा'; नृत्य विशारद कु. शाश्वती विजय मुळे यांचा उपक्रम !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ जून २०२४
सांगली येथील लोकप्रिय नृत्य प्रशिक्षक कत्थक नृत्य प्रशिक्षक कु. शाश्वती विजय मुळे यांनी नेटफ्लिक्सवर प्रचंड गाजत असलेल्या हिरामंडी या सिरीजमधील सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या गाण्यावर आधारित, दिनांक आठ व नऊ जून 2024 असे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा सांगली येथील प्रताप टॉकीज येथे सायंकाळी चार ते सात या वेळेत संपन्न होणार आहे

या दोन दिवसीय कार्यशाळेशिवाय लवकरच पुढील कार्यशाळेसाठी नोंदणी सुरू करण्यात येत असून सांगली परिसरातील तरुणी व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन कु. शाश्वती मुळे यांनी केले आहे. यासाठी 9921126015 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असेही त्यांनी म्हटले आहे.