Sangli Samachar

The Janshakti News

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तब्बल 4 मंत्रिपदं, दादांच्या राष्ट्रवादीलाही 2, मोदी कॅबिनेटमध्ये लॉटरी !



सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ८ जून २०२४
मोदी सरकारचा मंत्रिमंडळ फॉर्म्युला समोर आला असून त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात चार मंत्रिपदं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर रामदास आठवलेंनाही मंत्रिपद मिळणार आहे. केंद्रात महाराष्ट्राला एकूण 11 मंत्रिपदं मिळणार आहेत. राज्यात भाजपचे नऊ खासदार असून त्यापैकी पाच जणांची केंद्रात मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


महाराष्ट्रातून कुणाला संधी?

शिवसेना शिंदे गटाचे 7 खासदार निवडून आले असून केंद्रात त्यांना चार मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दोन कॅबिनेट तर दोन राज्यमंत्रिपदं मिळणार आहेत. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव किंवा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यापैकी दोघांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागू शकते. तर राज्यमंत्री म्हणून नरेश म्हस्के, धैर्यशील माने यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यापैकी एकाला कॅबिनेट आणि एकाला राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्ववादी अजित पवार गटाला लोकसभेत सुनील तटकरेंच्या रुपात एक जागा मिळाली आहे. तर प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर आहेत. गेल्या दोन टर्ममध्ये मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या रामदास आठवले यांना तिसऱ्या टर्ममध्येही मंत्रिपद मिळणार आहे.