Sangli Samachar

The Janshakti News

धक्कादायक.परदेशी प्रवाशाच्या पोटातून पंधरा कोटी रुपयांच्या कोकेनच्या ७७ कॅप्यूल मिळाल्या.| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ मे २०२४
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे अंमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून कोटे डी'आयव्होर या देशाच्या एका नागरिकाला अटक केली. प्रदीर्घ चौकशी नंतर या प्रवाशाने भारतात तस्करी करण्यासाठी अंमली पदार्थ असलेल्या कॅप्सूलचे सेवन केल्याची आणि त्या शरीरातून आणल्याची कबुली दिली.


या प्रवाशाला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला मुंबईतील सर जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.रूग्णालयात ६ ते ८ मे या कालावधीत या प्रवाशाच्या पोटातून १४६८ ग्रॅम कोकेन असलेल्या एकूण ७७ कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. या कोकेन साठ्याची अवैध बाजारातील किंमत सुमारे १५ कोटी रुपये इतकी आहे. या प्रवाशाला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.