Sangli Samachar

The Janshakti News

'बिल्डर पुत्र अपघात प्रकरणी' अजित पवार अंजली दमानिया यांचे आव्हान-प्रति आव्हान !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० मे २०२४
कल्याणीनगर 'बिल्डर पुत्र' अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांची नार्को टेस्ट करा, त्यांचा फोनही चेक करा, अशी मागणी अंजली दमानियांनी केली आहे. मी नार्को टेस्टला तयार आहे असे म्हणत अंजली दमानिया यांचे आव्हान अजित पवार यांनी स्वीकारले आहे. मात्र, हे आव्हान स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी अंजली दमानिया यांना एक ओपन चॅलेंज देखील दिले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलेलं आव्हान अजित पवारांनी स्वीकारलं. एवढंच नाही तर अजित पवारांनी अंजली दमानियांना प्रतिआव्हानही दिले. माझी नार्को टेस्टला तयारी आहे मात्र त्यातून मी क्लिअर निघालो तर अंजली दमानियांची पुन्हा माध्यमांसमोर यायचं नाही. अंजली दमानियांनी संन्यास घ्यायचा असं प्रतिआव्हान अजित पवारांनी दिले.

अजित पवार यांचे चॅलेंज अंजली दमानिया यांनी स्वीकारले

अजित पवार यांचे चॅलेंज अंजली दमानिया यांनी स्वीकारले आहे. अजित पवारांनी नार्को टेस्ट करायला तयार आहेत असे आत्ताच माध्यमांमधून कळले. पण जर सिद्ध झालं की त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध नाही आणि त्यांच्या मुलाला वाचण्याचा प्रयत्न केला नाही, फ़ोन केला नाही, तर जसे अजित पवार म्हणाले,की "मी गप्प घरी बसव आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा" हे मला पूर्णपणे मान्य. कधी करणार नर्को टेस्ट ते लवकरात लवकर कळवा... असं अंजली दमानिया म्हणाल्या.

पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का? असा आरोप अंजली दमानियांनी केलाय. त्याचबरोबर पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब खुलासा करावा अशी मागणी अंजली दमानियांनी केलीये..अजित पवारांनी फोन केला असेल तर तातडीने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी अंजली दमानियांनी केलीये. त्यावर आपण कोणालाही फोन केला नसल्याचा खुलासा अजित पवारांनी केला आहे.त्याचबरोबर कोणत्याही दबावाला बळी पडू नका अशा सूचनाही पोलिसांना दिल्याचं अजित पवार म्हणाले होते.यानंतर आात अजित पवार यांनी अंजली दमानिया यांना चॅलेंज दिले आहे.