Sangli Samachar

The Janshakti News

"जॉली एलएलबी"ला ओरिजिनल कोर्टात हजार राहावे लागणार| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ९ मे २०२४
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा 'जॉली एलएलबी 3' हा चित्रपट वादाच्या भोवऱयात अडकला आहे. 'जॉली एलएलबी 3' विरोधात अजमेर न्यायालयात तक्रार दाखल झाली आहे. वकील आणि न्यायाधीशांची खिल्ली उडवल्याप्रकरणी ही तक्रार असून शूटींग थांबवण्याची मागणी करण्यात आलेय. 


या चित्रपटात न्यायालयीन प्रतिष्ठsला कलंक लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटलंय. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते देशाच्या राज्यघटनेतील न्यायव्यवस्थेची मान आणि प्रतिष्ठsचा बिलकुल सन्मान करत नाही असे दिसते. ही तक्रार जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रभान सिंग राठोड यांनी केली.