Sangli Samachar

The Janshakti News

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृति दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पतसंस्थेत विनम्र अभिवादन
| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ मे २०२४
सर्व जातिधर्माच्या गोर-गरीब रयतेला शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे थोर समाजसुधारक तथा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था सांगली येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रथीमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.


कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यावेळी म्हणाले की, अण्णांच्या योगदानाचा वारस म्हणून आपण आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेतर्फे प्रामाणिक रित्या काम करून कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदरांजली वाहु. यावेळी संस्थेचे संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.