Sangli Samachar

The Janshakti News

कोंबडी आधी की अंडं? सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलं !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ मे २०२४
अंडं आधी की कोंबडी? हा कित्येक काळापासून वादाचा प्रश्न आहे. हा प्रश्न आला की या मुद्द्यावरून वाद होतातच. कुणी म्हणतं अंडं, कुणी म्हणतं कोंबडी. पण अंडं म्हटलं तर मग ते कुठून आलं कारण अंडं तर कोंबडीच देते आणि कोंबडी म्हटलं तर मग ती कुठून आली कारण ती अंड्यातूनच येते. त्यामुळे या प्रश्नाचं या दोघांपैकी काही उत्तर दिलं तर ते अचूक म्हणता येणार नाही. त्यामुळे उत्तर दिलं तरी प्रश्न तसाच कायम राहतो. पण अखेर या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे. कोंबडी आधी की अंडं, जगातील सर्वात कठीण प्रश्न म्हटला तरी चालेल. याबाबत संशोधकांनीही बराच अभ्यास केला. अखेर याचं उत्तर त्यांनी शोधून काढलंच आहे. शेफील्ड, वारविक आणि ब्रिस्टल, नानजिंग युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याचा शोध सुरू केला. अनेक वर्षांच्या शोधानंतर त्यांना याचं उत्तर सापडलं आहे.

अंड्याआधी कोंबडी

शास्त्रज्ञांनी अहवालात दावा केला आहे की हजारो वर्षांपूर्वी कोंबडी आजच्यासारखी नव्हती. त्यांनी अंड्याला जन्म दिला नाही तर पूर्ण पिल्लाला जन्म दिला. यानंतर त्यांच्यात सतत बदल होत गेले. ब्रिस्टल आणि नानजिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी असा दावा केला आहे की, अंडी घालण्याची क्षमता देखील पूर्णपणे ब्रूडी कोंबडीच्या प्रजातींमध्ये विकसित झाली आहे.


पुरावा काय ?

शेफील्ड, वारविक युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी कोंबडी आधी कशी याचं स्पष्टीकरणही दिलं आहे. संशोधनात दिसून आलं की, अंड्याच्या कवचेत एक ओवोक्लाइडिन नावाचं प्रोटिन असतं. याशिवाय अंड्याचं कवच बनूच शकत नाही. हे प्रोटिन फक्त कोंबडीच्या गर्भाशयात तयार होतं. जोपर्यंत कोंबडीच्या गर्भाशयातील प्रोटिनचा अंड्याच्या निर्मितीत वापर होत नाही, तोपर्यंत अंडं बनूच शकत नाही.
त्यामुळे जगात अंड्याआधी कोंबडी आली हे पक्कं झालं. जेव्हा कोंबडी आली तेव्हाच तिच्या गर्भाशयात ओवोक्लाइडिन बनलं आणि मग या प्रोटिनमुळे अंड्याचं कवच.

हे संशोधन करणारे डॉ कोलिन फ्रीमॅन यांनी सांगितलं, बऱ्याच कालावधीपासून लोक जगात अंडं आधी की कोंबडं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपलं डोकं खाजवत होते. अखेर शास्त्रज्ञांना पुराव्यानिशी याचं उत्तर सापडलं आहे. जगात आधी कोंबडी आली आणि त्यानंतर कोंबडीच्या गर्भामार्फत अंडं जगात आलं. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, पृथ्वीवर अंडी नव्हे तर पहिली कोंबडी आली होती. या विचित्र दाव्याबाबत शास्त्रज्ञांनी अनेक तथ्येही दिली ज्यावर अनेकांचा विश्वास बसत नाही आहे.