Sangli Samachar

The Janshakti News

वीजबिल जास्त येतेय, घरबसल्या ॲपवर करा तक्रार !

 
| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ मे २०२४
वीज ग्राहकांना अनेक अडचणींना रोज सामोरे जावे लागते. कधी मीटर रिंडीग जास्त घेतले जाते, बिल जास्त येते, वीजपुरवठा खंडित होतो, डीम लाईट असते, अशा अनेक तक्रारी ग्राहकांना असतात. त्या तक्रारी ग्राहकांना महावितरण कंपनीचे ॲप आणि वेबसाइटवर लागलीच सोडवून मिळणार आहेत. विविध प्रकारच्या सेवाही यावर मिळत आहेत. यामुळे इंटरनेट असल्यास वीजसंबंधीच्या विविध प्रकारच्या सेवा घरबसल्या मिळत आहेत. 'ऊर्जा चॅट बॉट' हे २४ तास कार्यान्वित आहे. 

आता वीज ग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी 'ऊर्जा चॅट बॉट' महावितरणच्या संकेतस्थळावर व मोबाइल ॲपवर उपलब्ध आहेत. मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येतात. नवीन वीज जोडणी, वीजबिल भरणा, तक्रार निवारण आदींबाबत माहिती घेण्याची सोय उपलब्ध आहे. घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, कृषीचे जिल्ह्यात सुमारे सव्वाआठ लाख ग्राहक आहेत.


याबाबतची माहिती मिळणार ?

नवीन वीज जोडणी, त्यासाठी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती, वीजबिल भरणा किंवा वीजबिलाचा तपशील, जलद वीजबिल भरणा, मोबाईल क्रमांक, ई मेल नोंदणी, विविध शुल्काचा ऑनलाइन भरणा, गो-ग्रीन नोंदणी, वीज वापर, बिलाच्या कॅलक्युलेटरची माहिती ऑनलाइन मिळणार आहे. 'ऊर्जा'च्या माध्यमातून संबंधित सेवा ग्राहकांसाठी थेट ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहेत. संबंधित सेवेची थेट लिंक ग्राहकांना मिळणार आहे. सोबतच वीजपुरवठा खंडित होणे, वीजबिलांसह इतर तक्रारीबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. तक्रार करण्यासाठी 'महावितरण'चे चोवीस तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांक, एसएमएस क्रमांक, मिस्ड कॉल सेवा आदींची माहिती चॅट बॉटद्वारे उपलब्ध होणार आहे.