Sangli Samachar

The Janshakti News

तर मला फाशी द्या!! अदाणी-अंबानी मुद्द्यावरून नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले, थेट आव्हानही दिलं !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिद्ली - दि. २२ मे २०२४
मोदी सरकार हे अदाणी-अंबानींचंच सरकार आहे, अशी टीका राहुल गांधी सातत्याने नरेंद्र मोदींवर करत असतात. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्यांदाच ते याबाबत बोलले आहेत. यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, संपत्ती निर्माण करणाऱ्यांच्या मी पाठीशी उभा असून यात मी काही चुकीचं किंवा अप्रामाणिकपणे कोणाचा फायदा केला असेन तर शिक्षेला सामोरा जाण्यास तयार आहे. मोदी म्हणाले, जवाहरलाल नेहरूजींच्या सरकारला बिर्ला-टाटांचे सरकार म्हणून हिणवले जायचे. यामुळे मलाही अशाचपद्धतीने हिणवायची अनेकांची इच्छा आहे, असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या पाहुण्यांच्या यादीत मी खेळाडू आणि यश मिळविणाऱ्यांना बोलावतो. जर देश आपल्या कर्तृत्वाची पूजा करत नाही आणि त्याची कदर करत नाही, तर शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ माणसे आपल्याला कशी मिळणार? असेही मोदी म्हणाले.


सर्व स्तरातील यशवंतांचा सन्मान केला पाहिजे. जर मी अप्रामाणिकपणा केला असेल तर मला फाशी द्या. जर मी चुकीच्या मार्गाने कोणाचाही फायदा केला असेल तर मला फाशी द्या. पण मी माझ्या देशातील संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा आदर करेन, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. माझ्यासाठी तो भांडवलदारांचा पैसा, व्यवस्थापकीय लोकांची हुशारी आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या कष्टकऱ्यांचा घाम याचा मी आदर करतो, असंही ते पुढे म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे मांडले.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अंबानी अदानी यांचे नाव घेऊन टीका करत असतात. त्यांना मदत केली जाते मात्र शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही, अशीही टीका केली जाते. मोदींनी यावर आता उत्तर दिले आहे.