Sangli Samachar

The Janshakti News

उन्‍हाळ्यातील उकाड्यादरम्‍यान मधुमहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी फॉलो करा या टिप्‍स !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३१ मे २०२४
तापमान वाढत आहे आणि उन्‍हाळ्यातील उकाडा असह्य होत आहे. उष्‍णतेच्‍या लाटांमुळे दैनंदिन नित्‍यक्रमांमध्‍ये व्यत्यय येऊ शकतो आणि मधुमेह व्‍यवस्‍थापनावर परिणाम होऊ शकतो. मुंबईतील डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल पवईचे मेटबोलिक फिजिशियन डॉ. विमल पहुजा म्‍हणाले, ''मधुमेहाचे व्यवस्‍थापन करण्‍यासाठी आरोग्‍यदायी नित्‍यक्रम राखणे आवश्‍यक आहे. पण उन्‍हाळ्यादरम्‍यान अनेकदा त्यामध्ये व्‍यत्‍यय येतात. दैनंदिन सवयींमध्‍ये बदल केल्‍यास मधुमेह-अनुकूल आहाराचे पालन करण्‍यामध्‍ये किंवा वेळेवर रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांची तपासणी करण्‍यामध्‍ये चूक होऊ शकते. तसेच, कडक उकाड्यादरम्‍यान मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींना विशेषत: त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळी अनियंत्रित राहिल्‍यास डिहायड्रेशनचा उच्‍च धोका असतो. रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे प्रभावीपणे संतुलन राखण्‍यासाठी कन्टिन्‍युअल ग्‍लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) सारख्‍या उपाययोजनांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. स्मार्ट फोनशी सुसंगत असलेले सीजीएम डिवाईस चालता-फिरता रिअल-टाइम मॉनिटरिंग देते. मधुमेह व्यवस्थापनाबाबत तडजोड न करता नित्‍यक्रमामधील बदलांना प्रतिबंध करते.''

काय आहे कन्टिन्‍युअस ग्लुकोज मॉनिटरिंग डिवाईस

मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींनी उन्‍हाळ्यादरम्‍यान दिवसभरातील अधिक काळापर्यंत शिफारस केलेल्‍या लक्ष्‍य रेंजमध्‍ये (७० ते १८० mg/dl ) रक्‍तातील शर्करेच्‍या पातळी राखणे महत्त्वाचे आहे. कन्टिन्‍युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) डिवाईसचा वापर करत हे साध्‍य करता येते. सीजीएम डिवाईस बोटाला टोचण्‍याची गरज न लागता रक्तातील शर्करेच्‍या पातळीबाबत माहिती देतात. अशा डिवाईसमध्‍ये टाइम इन रेंज सारखे मेट्रिक्‍स असतात आणि रीडिंग्‍ज तपासण्‍यामधून सानुकूल रेंजमध्‍ये अधिक वेळ व्यतित होण्‍याची खात्री मिळते. ज्‍यामुळे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळीवरील नियंत्रण सुधारू शकते.


उष्‍णतेच्‍या लाटांवर मात करत मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

हायड्रेशन सर्वाधिक महत्त्वाचे

उष्‍णतेच्‍या लाटांदरम्‍यान डिहायड्रेशनला प्रतिबंध करण्यासाठी तहान लागलेली नसताना देखील भरपूर प्रमाणात पाणी पित हायड्रेटेड राहण्‍याची खात्री घ्‍या. योग्‍य हायड्रेशनमुळे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळीचे निय‍मन करण्यामध्ये मदत होण्‍यासोबत रक्‍तप्रवाहामधील टॉक्झिन्‍स उत्‍सर्जित देखील होतात. मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींना विशेषत: उष्‍ण तापमानादरम्‍यान शरीरातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होण्‍याच्‍या शक्‍यतेमुळे डिहायड्रेशनचा उच्‍च धोका असतो.

नियमितपणे रक्‍तातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवा

उष्‍णतेमध्ये रक्‍तातील साखरेच्या पातळीवर सतत देखरेख ठेवणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. फ्रीस्‍टाइल सारखे प्रगत सेन्‍सर-आधारित कन्टिन्‍युअल मॉनिटरिंग डिवाईसेस तुम्‍हाला व्यायाम करत असताना किंवा झोपलेले असताना अहोरात्र रक्‍तातील शर्करेच्‍या पातळीवर देखरेख ठेवण्‍यास मदत करतात. हे डिवाईसेस रक्‍तातील साखरेच्या पातळीवर बारकाईने लक्ष ठेवतात आणि त्‍यामध्‍ये चढ-उतार झाल्‍यास अचूक, रिअल-टाइम अलर्टस् देतात.

स्मार्टपणे व्‍यायामाचे नियोजन करा

मधुमेह केअरमधील आवश्‍यक घटक सक्रिय जीवनशैली आहे. पण उष्‍माघात व डिहायड्रेशनपासून स्‍वत:चे संरक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे. तापमान उष्‍ण असताना घराबाहेर पडू नका आणि त्‍याऐवजी इनडोअर व्‍यायाम किंवा योगाचा अवलंब करा.

आरोग्‍यदायी आहाराचे सेवन

उन्‍हाळ्यादरम्‍यान आईस्‍क्रीम व स्‍लशीजचा आस्‍वाद घेणे स्वाभाविक आहे. पण मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींनी अधिक सावधगिरी राखण्‍याची आणि त्‍यांच्‍या स्थितीला अनुकूल संतुलित व आरोग्‍यदायी आहाराचे सेवन करण्‍याची काळजी घेतली पाहिजे. सेलेरी व ब्रसेल स्‍प्राऊट्स सारख्‍या हाय फायबर असलेल्‍या भाज्‍या व पालेभाज्‍यांचा आहारामध्‍ये समावेश केल्‍यास रक्‍तातील साखरेच्या पातळीचे नियमन करण्‍यास मदत होऊ शकते.