Sangli Samachar

The Janshakti News

अजित पवार नॉट रिचेबल ! अखेर पुण्यात उपस्थित होऊन केला खुलासा !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १६ मे २०२४
बारामती मतदारसंघातील मतदान 13 मे रोजी पार पडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कुठे आहेत यासंदर्भात समर्थकांना प्रश्न पडला आहे. बारामतीमधील मतदानाआधी अगदी दररोज प्रसारमाध्यमांबरोबर संवाद साधणारे आणि प्रचारसभांना हजेरी लावणारा अजित पवार अचानक नॉट रिचेलब झाले. त्यामुळेच समर्थकांबरोबरच विरोधकांकडूनही अजित पवारांच्या ठावठिकाण्याबद्दल प्रश्न विचारले जात होते. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मात्र या दौऱ्यातील कोणत्याही कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहिले नाहीत. आता अजित पवार कुठे आहेत यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यांचे चुलते आणि राजकीय विरोधक शरद पवार यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे.

अजित पवार मोदींच्या कार्यक्रमांपासून दूर

मोदींच्या बुधवारच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते. अजित पवारही मोदींच्या सुरुवातीच्या काही दौऱ्यांदरम्यान सभांना हजर होते. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी त्यांचं लक्ष बारामतीमधील प्रचारावर केंद्रित केल्याचं दिसलं. बुधवारी दिंडोरीतील सभेमध्ये अजित पवारांऐवजी छगन भुजबळ उपस्थित होते तर कल्याणमधील सभेला सुनील तटकरेंनी हजेरी लावली. मात्र अजित पवार या सभांनाही दिसेल नाहीत किंवा घाटकोपरमधील रोड शोमध्येही सहभागी झाले नाहीत. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून उमेवदारी अर्ज भरताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. इथेही अजित पवारांऐवजी प्रफुल्ल पटेलांनीच उपस्थिती लावली.

वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे दावे...

अजित पवारांच्या प्रसारमाध्यम समन्वय करणाऱ्या टीमने अजित पवार दोन दिवसांपासून कुटुंबीयांसोबत बाहेर आहेत. नेमके कुठे आहेत माहिती नाही, असं सांगितलं आहे. अजित पवारांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. देवगिरी बंगल्यावरील स्वागत कक्षामध्ये अजित पवारांबद्दल विचारणा केली असता, "दादांचा दौरा आमच्याकडेही नाही. त्यामुळे कुठे आहेत माहिती नाही," असं सांगण्यात आलं. शरद पवार यांना अजित पवारांसंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी, "अजित पवार खरंच आजारी आहेत," असं उत्तर दिलं.

अखेर अजित पवार पुण्यात हजर आणि सर्व शक्यतांना पूर्णविराम..

पण अखेर आज सकाळी पुण्यातील एका कार्यक्रमात अचानक हजेरी लावून त्यांनी सर्वच शक्यतांना पूर्णविराम दिला आपली तब्येत बिघडल्यामुळे विश्रांतीसाठी आपण अज्ञातस्थळी गेलो असल्याचे स्वतः अजित पवार यांनी सांगितल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम लागलेला आहे