Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतील कोल्हापूर रोडवरील अनधिकृत होर्डिंग हटवले !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ मे २०२४
मुंबईच्या घाटकोपर येथील पेट्रोल पंपावरील जाहिरात होर्डिंग दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील सर्वच नियमबाह्य जाहिरात होर्डिंग हटवण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले होते. त्यानुसार सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली मिरज कुपवाड येथील नियमबाह्य होर्डिंग हटवण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार कोल्हापूर रोड वरील नियमबाह्य २० बाय ५० अवाढव्य जाहिरात होर्डिंग हटवण्यात आले.


शुभम गुप्ता यांनी सांगली मिरज कुपवाड शहरातील समस्या दूर करण्याबाबत या तत्परतेने पावले उचलली आहेत, त्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.