Sangli Samachar

The Janshakti News

काही बोलायचं, सांगायचं म्हटलं तर बरंच भयानक सत्य उघडकीस येईल - संजय काका| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ मे २०२४
काही बोलायचं, खरं सांगायचं म्हटलं तर बरंच भयानक सत्य उघडकीस येईल, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी केले. काल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ, फोटो व बातमी बाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला संजय काका उत्तर देत होते.

यावेळी बोलताना संजय काका म्हणाले की, काल जे काही व्हायरल झाले आहे ते मी पाहिलेले नाही. परंतु त्यात जर काही चुकीचे वा खोटे असेल तर त्यानी पोलिसात तक्रार करावी. जे सत्य असेल ते बाहेर येईलच.


नाचता येईना अंगण वाकडे, असा हा प्रकार असून, पराभव समोर दिसू लागल्यामुळे हे सारे प्रकार सुरू आहेत असे सांगून, संजय काका म्हणाले की, रात्री तीन वाजल्यापासून मतदारांना फोन करण्यात येत असून रडून रडून आमचे घराणे वाचवा, आम्हाला मतदान करा, असे सांगितले जात आहे. परंतु सांगली जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा असून हा मानसिक गुलामगिरीत राहणारा जिल्हा नाही. गेली 35 वर्षे यांच्या घराण्यात सत्ता होती. त्यामुळे लोकांना सारे काही ठाऊक आहे, लोकांनी खूप भोगले आहे, त्यांना ठाऊक आहे ही कुचकामी निकम्मी माणसं आहेत. त्यामुळे लोकांनी आता ठरवलेलं आहे. ही निवडणूक लोकांनीच हाती घेतलेली असल्यामुळे यावेळी पुन्हा एकदा माझी हॅट्रिक पक्की असल्याचा विश्वास संजय काका यांनी यावेळी व्यक्त केला.