Sangli Samachar

The Janshakti News

...तर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते, महाराष्ट्र माज खपवून घेत नाही, शिंदे गटाचा धुआँ निघणार !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २७ मे २०२४
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने गैरप्रकार केल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे. यावरूनच आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दादागिरीने काही होत असते तर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते, महाराष्ट्र माज खपवून घेत नाही, शिंदे गटाचा धूर निघणार, असे तुपकर यांनी म्हटले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी म्हटले की, शिंदे गटाचा महाराष्ट्रात धुआँ निघणार आहे. महाराष्ट्र माज खपवून घेत नाही. सत्तेचा माज शिंदे गटाला आहे. त्यांचा धुवा उडणार आहे. सगळ्याच पक्षात धुसफूस आहे. एकमेकांच्या विरोधात लढले वरच्या नेत्यांनी युती केली. जिरवा-जिरवीच्या राजकारणात व्यस्त आहेत.


एकनाथ शिंदेंनी खूप पैसे वाटले, उदय सामंत सारखे मंत्री फक्त पैसे वाटायला होते. हजारो कोटींचा वापर एकनाथ शिंदेंनी केला. हेलीकॉप्टरने पैसे वाटले. दादागिरीने राजकारण होत नाही, नाहीतर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते, असे तुपकर म्हणाले. रविकांत तुपकर यांनी म्हटले की, महाराष्ट्राला नवा पर्याय देण्याची गरज आहे. राज्याचा दौरा करणार आहे. गरीब, वंचित, तरुणांना राजकारणात आणणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर फक्त राजू शेट्टी लढले. मी अपक्ष होतो. कुठल्याही माणसाने ज्योतिष वर्तणे बरोबर नाही. सगळेच दावे करतात आम्ही येणार मी असे दावे करणार नाही. जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य असेल. 

तुपकर यांनी म्हटले की, नवीन पक्ष काढण्याचा माझ्या डोक्यात विचार नाही. पण प्रस्थापितांच्या चळवळीची स्पेस तरुणांना खुणावत आहे. तरुण एकत्र येऊन नवीन पर्याय देणार आहेत.
पक्ष म्हणून असे नाही पण सगळ्यांची मोट बांधू.
राजकारणात सामान्यांच्या पोरांनी का येऊ नये.
चांगल्या विचाराचे लोक राजकारणात आले पाहिजेत.