Sangli Samachar

The Janshakti News

मनाला चटका लावणारा शेवट, स्टेजवर परफॉर्म करताना प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ मे २०२४
सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. स्टेजवर परफॉर्म करत असताना प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्याचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगोत्सवात व्यासपीठावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश जोशी यांचं निधन मनला चटका लावणारा शेवट आहे. सतीश जोशी शेवटत्या श्वासापर्यंत त्यांच्या कामाशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनानुळे सिनेविश्व आणि चाहत्यांमध्ये दुःखाचं वातावरण आहे. सेलिब्रिटी आणि चाहते त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली देत आहेत.

रंगोत्सवात व्यासपीठावर असताना सतीश जोशी अचानक जमीनीवर पडले आणि त्यांचं निधन झालं.सतीश जोशी यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. राजेश देशपांडे यांनी फेसबूकवर सतीश जोशी यांचा एक फोटो पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.


राजेश देशपांडे म्हणाले, आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दुःखद निधन झाले. ओम शांती ओम.’, सतीश जोशी यांच्या निधनानंतर कलाकार आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे सिनेविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे… असं म्हणायला हरकत नाही.

सतीश जोशी यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अभिनय केला. स्टेजवर परफॉर्म करत असताना सतीश जोशई यांनी निधन झालं. 'सृजन द क्रिएशन' या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रमात सतीश जोशी देखील उपस्थित होते. पण कार्यक्रम सुरु असताना त्यांचं निधन झालं… अशी माहिती समोर येत होती. पण राजेश देशपांडे यांनी सतीश जोशी यांच्या निधनाचं सत्य सांगितलं आहे.
रविवारी सकाळी 11 वाजता मध्यांदिन ब्राह्मण सभा येथे गिरगाव रंगभूमीवर एक छोटा प्रवेश सादर केला. त्यानंतर सतीश जोशी यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे त्यांना तात्काळ हरकिसन दास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली… असं राजेश देशपांडे म्हणाले.