Sangli Samachar

The Janshakti News

आंतरराष्ट्रीय स्तरावरील परताव्यात भारत नंबर १| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ मे २०२४
युनायटेड नेशन मायग्रेशन एजन्सीने एक महत्वपूर्ण माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. यात म्हटले गेले की, आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारत वैश्विक पातळीवरील परताव्यात मध्ये क्रमांक १ देश बनला आहे.भारतात २०२२ मध्ये १११ अब्ज डॉलर्सचा परतावा मिळाल्याचे सांगितले गेले असून भारत क्रमांक एकचा देश आहे. 

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संस्थेने २०२४ अहवाल सादर करून त्यात आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारत, मेक्सिको, चीन, फिलिपाईन्स, फ्रान्स या देशांत सर्वाधिक रेमिंटस झाले आहेत. या रिपोर्टमध्ये काही महत्वाची निरिक्षण नोंदवली गेली आहेत ज्यामध्ये भारताने सर्वाधिक चांगली कामगिरी करत १११ अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे. १०० अब्ज युएस डॉलर्सचा टप्पा पार करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचा नंबर लागला आहे २०२१ मध्ये चीनला मागे टाकत मेक्सिकोचा दुसरा नंबर २०२२ मध्ये कायम आहे असे अहवालात म्हटले आहे.'


अहवालातील माहितीप्रमाणे, भारताने आर्थिक वर्ष २०१० मध्ये ५३.४८ अब्ज डॉलर, २०१५ मध्ये ६८.९१ अब्ज, २०२० मध्ये ८३.१३ अब्ज, व २०२२ सालात १०० अब्ज पार करून १११.२२ अब्जावर भारताचा परतावा गेला आहे. दक्षिण आशियाईमधील स्थलांतर करणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. यामधील भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांचा जागतिक परताव्यात पहिल्या पाच क्रमांकात नंबर लागतो असं संस्थेने म्हटले आहे. मुख्यतः स्थलांतरामुळे परताव्यात मोठी वाढ झाली आहे. भारत हा क्रमांक १ चा परतावा घेणारा देश ठरला आहे.

पाकिस्तान व बांगलादेश यांचा परताव्यात अनुक्रमे सहावा व आठवा क्रमांक ठरला आहे २०२२ मध्ये ही आर्थिक उलाढाल अनुक्रमे ३० अब्ज डॉलर व २१.५ अब्ज डॉलर मूल्यांचा परतावा संबंधित देशांना मिळवला आहे. दुसरीकडे स्थलांतर केल्याने कुटुंबाची जबाबदारी असल्याने तसेच इतर खर्च यामुळे येणारा परतावा हा अनेक कारणांनी कुटुंबांना जगण्यासाठी आधार देतो. अनेकदा असे असूनही या स्थलांतरित कामगारांना आर्थिक चणचण भासते ज्यामध्ये कर्जाचा,अथवा खर्चाचा बोजा व आर्थिक पिळवणूक या गोष्टींचा सामना देखील करावा लागतो हे देखील या अहवालात नमूद केले गेले आहे.

अहवालातील माहितीप्रमाणे, सर्वाधिक स्थलांतर मध्यपूर्वेतील खाडी देशात झाली आहेत याचा दाखला म्हणजे गल्फ कॉर्पोरेशन काऊन्सिलचा मांडणीनुसार, या देशातील एकूणच लोकसंख्येतील मोठ्या प्रमाणात या स्थलांतरित लोकांची संस्था असल्याचे संस्थेने म्हटले आहे. युएई, कुवेत,कतार या देशातील त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या अनुक्रमे ८८,७३,७७ टक्के वाटा स्थलांतरित नागरिकांचा आहे.

या अहवालात नमूद केल्याप्रमाणे सर्वाधिक स्थलांतरित लोकांची संख्या भालतातून असून आखाती देशांत त्यांची सर्वाधिक संख्या आहे. जगातील लोकसंख्येच्या एकूण भारतीय लोकसंख्या १.३ टक्के आहे. दुसऱ्या बाजूला स्थलांतरितासाठी भारत हा १३ व्या क्रमांकाचा पर्याय असल्याचे म्हटले आहे. स्थलांतरित परताव्यात भारतानंतर दुसरा क्रमांक मेक्सिको देशाचा लागतो. याआधी चीन हा दुसरा क्रमांकावर होता तरी २२० मध्ये चीनला मागे टाकत मेक्सिको दुसरा क्रमांक ठरला आहे. या अहवालातील माहितीप्रमाणे, मेक्सिकोने २०२२ मध्ये ६१ अब्ज डॉलरचा परतावा केला होता.२०२२ मध्ये चीनला ५१ अब्ज डॉलर्सचा परतावा मिळाला होता.

अहवालाप्रमाणे, चीनचा दुसरा क्रमांक जाण्यामागे अनेक कारणे आहेत ज्यामध्ये घटलेली कमावणारी जनसंख्या, भौगोलिक कारणे, कोविड धोरणे या कारणांमुळे चीनमधील लोकसंख्येवर बाहेर जाऊन काम करण्यावर बंधने आली होती. आशियाई देशातील विद्यार्थी सर्वाधिक स्थलांतर करतात असेही यात म्हटले आहे. यामध्ये चीनहा स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे स्थळ आहे ज्यामध्ये विशेषतः कोरिया, थायलंड, पाकिस्तान, भारत या देशाचे विद्यार्थी समाविष्ट आहेत.