Sangli Samachar

The Janshakti News

'अमन कम्प्युटर इन्स्टिट्यूट'चा मतदान जागृती बाबत स्तुत्य उपक्रम| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ मे २०२४
काल मंगळवार दिनांक 7 मे रोजी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपन्न झाले. मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे म्हणून प्रशासनामार्फत विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते, याला जोड मिळाली ती जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांची. पथनाट्य, रिल्स, सोशल मीडियावर विविध प्रकारच्या संदेशातून, तसेच अन्य माध्यमातून मतदान जागृती करण्यात आली.

सांगली शहरातील अमन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. पंचमुखी मारुती वरील इन्स्टिट्यूटच्या कार्यालयापासून राम मंदिर पर्यंत, प्रचार फेरीच्या ' छोडो सारे अपने काम, पहले करे मतदान' अशा प्रकारच्या घोषणा देत, मतदान जागृतीचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात विविध घोषवाक्यांचे फलक होते. विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नाला नागरिकातून याला उत्तम प्रतिसाद लाभला आणि कौतुकही.


अमन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ही विद्यार्थ्यांना एम एस.सी.आय.टी.चे शिक्षण देणारी संस्था असून, आतापर्यंत या संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी व शिक्षणासाठी खूप चांगला फायदा झाला आहे. केवळ संगणक साक्षरताच नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी संस्थेच्या संचालिका पिंटी कागवाडकर या प्रयतनशील असतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक प्रगल्भता निर्माण व्हावी, समाजाबद्दल त्यांच्या मनात आदर, प्रेमभावना निर्माण व्हावी म्हणूनही त्यांचा प्रयत्न असतो. याबद्दल विविध संस्थांकडून अमन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा व पिंटू कागवाडकर यांचा विविध पुरस्काराने गौरव ही करण्यात आला आहे.