Sangli Samachar

The Janshakti News

पुणे हिट अँड रन प्रकरणामुळे सांगली राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ मे २०२४
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामुळे सांगली राज उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आला आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके नियुक्ती करण्यात आली आहेत. अशी माहिती सांगली जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक प्रदीप पोटे यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये जे बार परमिट रूम्स आहेत, त्यांचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 700 परमिट रूम्स आहेत. सदर परमिट रूम्स बंद करण्याची वेळ रात्री साडेअकराची आहे, असे सांगून पोटे म्हणाले की, कोणत्याही परमिट रूम मध्ये अल्पवयीन मुलाला प्रवेश देऊ नये अशा सक्त सूचना देण्यात आले आहेत. सर्व व्यावसायिकांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोठेही अल्पवयीन मुलाला मद्य विक्री केली जाऊ नये यासाठी भरारी पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे.

पोटे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, एखाद्या बार अथवा परमिट रूममध्ये अल्पवयीन मुलाला मद्य येत असल्याचे विक्री आढळून आल्यास याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास देण्यात यावी. असे कोणतेही गैर प्रकार आढळलेस संबंधित बार अथवा परमिट रूमवर सक्त कारवाई करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिला आहे