Sangli Samachar

The Janshakti News

नरेंद्र मोदींसाठी ही निवडणूक का महत्त्वाची? तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी काय करू शकतात ?| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ मे २०२४
मतदान कमी झालं म्हणजे त्याचे नक्की काय परिणाम होतात? तर सामान्यतः अशी मान्यता आहे की जेव्हा लोकांना त्वेषाने बदल करायचा असतो तेव्हा भरभरून मतदान होतं. जितकं कमी मतदान, म्हणजे बदल घडवण्यासाठीचा निरुत्साह. मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत, जिथे राजकारणाने अनाकलनीय, अभद्र युती-आघाडीचे वळण घेतले तिथे हा टक्का मतदात्यांचा संभ्रम आणि निराशेचे तर द्योतक नाही ना? हा विचार स्वाभाविक मनात येतो.
महाराष्ट्रात झालेली निवडणूक ही प्रत्येक राजकीय पक्षासाठी, देशातल्या प्रमुख नेत्यांसाठी आव्हानात्मक ठरलीय.

ही निवडणूक ज्या नेत्यांसाठी महत्त्वाची आहे त्यातील सर्वात वरचं नाव हे अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं. 2014 आणि 2019 अशा सलग दोन वेळा भाजपला बहुमत मिळवून देत दहा वर्ष मोदी पंतप्रधानपदी विराजमान होते. यावेळी त्यांनी चारशे पारचं लक्ष्य ठेवलं आहे. मात्र त्यांच्या वाटेत इंडिया आघाडीने बरीच आव्हानं उभी केली आहेत.

मोदी जिंकले तर काय होणार ?

- जिंकले तर सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळवत पंतप्रधान होणार.
- पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर हॅटट्रिक साधणारी पहिली व्यक्ती ठरणार.
- 2019 साली शिवसेना मोदींच्या नावावर जिंकली हे सिद्ध होणार
- स्थानिक मुद्दे नाही तर मोदींची विकासकामं भावली हे सिद्ध होणार.
- ठाकरे-पवार सहानुभूती कार्ड चाललं नाही हे सिद्ध होणार.
- महाराष्ट्रातही सर्वात मोठा ब्रँड मोदी हे सिद्ध होणार.
- विधानसभेसाठी भाजप आणि महायुतीची संधी वाढणार.

तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी काय करू शकतात ?

- तिसऱ्या टर्ममध्ये आणखी धाडसी निर्णय घेणार.
- विकासकामांचा वेग वाढवता येणार.
- काशी, मथुरा प्रश्न सामोपचाराने सोडवण्यावर भर.
- समान नागरी कायदा लागू करण्याची शक्यता.
- राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर अधिक लक्ष.
- भाजप अंतर्गत स्थान अधिक बळकट होणार.
- शपथविधीनंतर पहिल्या 100 दिवसात घ्यायचे मोठे निर्णय तयार आहेत.
- वन नेशन वन इलेक्शन लागू करण्याला जोर देणार.
- महिला आरक्षण अंमलात आणणार.
- प्रलंबित जनगणना 2025 मध्ये पूर्ण करणार.
- कृषी व इतर क्षेत्रासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेणार.

जागा कमी आल्या तर ?

- जागा कमी आल्या तर पक्षातील इतरांना संधी मिळण्याची शक्यता.
- इंडिया आघाडीचं सरकार आलं तर निवृत्ती घेण्याची शक्यता.