Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीचा सुपुत्र राकेश धोंडांना वर बनला नागपूरचा स्वच्छता दूत !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० मे २०२४
पृथ्वीतलावर जन्मलेल्या प्रत्येकावर समाजऋण असते. त्या ऋणाची परतफेड 100 पैकी 99 मंडळी करीतच नाही. केवळ एक टक्काच व्यक्ती ते ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात. यातीलच एक आहे सांगली येथील निर्धार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राकेश दोड्डणावर. या धाडसी युवकाने 1 मे 2018 रोजी सांगली शहरात स्वच्छता मोहीम सुरू केली. याचा सुगंध आता संपूर्ण महाराष्ट्रात दरवळू लागला आहे. याच युवकाची गेल्या 8 दिवसांपासून नागपुरात जगदीश मूर्तीकार यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम सुरू आहे.

1 मे 2024 रोजी राकेशने सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, हिंगोली, संभाजीनगर, बीड, रायगड, मुंबई या 10 जिल्ह्यात एकाचवेळी स्वच्छता मोहीम राबविली. राकेश दड्डणावर यांच्या मते युवकांनी एक तास स्वच्छतेसाठी दिले तरी भरपूर लाभ समाजाला होतो. आम्ही जेव्हा काही मित्रांना सोबत घेऊन कार्य सुरू केले तेव्हा आम्हाला अनेकांकडून शाबासकी मिळाली. प्रोत्साहन मिळत गेल्याने आमचे कार्य आता वाढले आहे. यापुढेही असेच कार्य सुरू ठेवणार असल्याचाही निर्धार राकेश दड्डणावर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, राकेश कुणाकडूनही आर्थिक मदत घेत नाही. समाजभान जपणार्‍यांना काही द्यायचे असेल तर त्यांनी झाडू किंवा स्वच्छता मोहीमेसाठी आवश्यक तेच साहित्य घेतो. 


अधिकार नको कर्तव्य करा

आम्ही कर देतो म्हणजे सर्व काही सरकारने करायला हवे, अशी मनोवृत्ती सर्वांमध्ये वाढली आहे. पण वाढती लोकसं'या पाहता आपण प्रत्येक गोष्ट सरकारसह प्रशासनाकडून अपेक्षित ठेवणे योग्य नाही. आपण अधिकाराची चर्चा करतो. त्यापूर्वी कर्तव्याला प्राधान्य द्यावे. सांगलीच्या राकेश दड्डणावर या धाडसी युवकाने निर्धार फाऊंडेशनमार्फत सुरू केलेली स्वच्छता मोहीम हटके आणि लाभदायक उपक'म असल्याने जनतेने त्याला सहकार्य करावे, असे आवाहन ग'ाहक कल्याण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आशीष अटलोए यांनी केले आहे.