Sangli Samachar

The Janshakti News

जपानमध्ये नवा ट्रेंड... 'फ्रेंडशिप मॅरेज' !


| सांगली समाचार वृत्त |
टोकिओ - दि. १८ मे २०२४
बदलत्या काळानुसार नात्याचे स्वरुपही बदलत चाललंय. आजकाल विविध ट्रेंड आपल्याला दिसत आहेत." सध्या लोकांसाठी नात्याची व्याख्या झपाट्याने बदलत आहे. जगभर नात्यांमध्ये दररोज वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर रिलेशनशिपमध्ये अनेक प्रकारचे ट्रेंड लोकप्रिय होऊ लागले आहेत. सध्या फ्रेंडशिप मॅरेजचाही असाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. जो सध्या जपानमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. हा विवाहाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये लोक एकमेकांवर प्रेम न करता किंवा शारीरिक संबंध न ठेवता जोडीदार बनत आहेत. या नवीन रिलेशनशिप ट्रेंडबद्दल जाणून घेऊया..

नात्याची व्याख्या झपाट्याने बदलतेय

आजकाल जपानमध्ये नवीन प्रकारचे नाते लोकप्रिय होत आहे. येथील तरुणांमध्ये फ्रेंडशिप मॅरेज मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट नुसार, या नवीन प्रकारच्या वैवाहिक संबंधात, लोक एकमेकांवर प्रेम न करता किंवा शारीरिक संबंध न ठेवता प्लॅटोनिक भागीदार बनत आहेत. हा ट्रेंड जपानमध्ये इतका लोकप्रिय झाला आहे की हजारो लोक, या प्रकारचे रिलेशनशिप निवडत आहेत.


मैत्री विवाहाची व्याख्या काय ?

हे रिलेशन म्हणजे पारंपारिक, रोमँटिक प्रेमविवाह किंवा आपल्या जिवलग मित्राशी लग्न करण्यासारखे नाही, ही एक अशी पद्धत आहे, ज्यामध्ये जोडपे लग्नाच्या आधी भेटतात आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित सर्व गोष्टींवर चर्चा करतात. जसे की एकत्र जेवायचे की नाही, तास घालवायचे किंवा घराची विभागणी कशी करावी, घरातील कामे कशी विभागली जातील यावर सहमती दर्शवतात. अनरोमँटिक वाटत असूनही, या प्रकारच्या नातेसंबंधामुळे सुमारे 80% जोडप्यांना आनंदाने एकत्र राहण्यास मदत झाली आहे, बऱ्याच प्रकरणांमध्ये, काही जोडपी मुलांचे संगोपन देखील करत आहेत, असे एजन्सीने म्हटले आहे.

मैत्री विवाह कोण निवडत आहे ?

SCMP नुसार, अशा प्रकारच्या नातेसंबंधात स्वारस्य असलेले लोक सरासरी 32 ते 33 वर्षांचे आहेत आणि त्यांचे उत्पन्नही जास्त आहे. पारंपारिक विवाह पद्धतीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या समलैंगिकांमध्ये देखील हे खूप लोकप्रिय आहे.