Sangli Samachar

The Janshakti News

सांगली व मिरज शहरातील कॅफे चालकांची पोलीस मुख्यालयात बैठक !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ मे २०२४
सांगली व मिरज शहरातील कॅफे चालक यांची पोलीस अधिक्षक कार्यालय सांगली येथे दि.२४.०५.२०२४ रोजी श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली यांनी बैठक आयोजीत केली होती.

सदर बैठकी मध्ये मा. पोलीस अधीक्षक यांनी, कॅफे चालक यांनी चालवत असले कॅफेमध्ये प्रथम दर्शनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच ते सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत आहेत का व त्यामधील डाटा जास्त काळापर्यंत स्टोअर राहतो का याची दररोज खात्री केली पाहिजे. संशयीत लोकांचे बाबत चौकशी करुन त्याबाबत संबधीत पोलीस ठाणेशी संपर्क साधुन माहिती दिली पाहिजे. 


मा. जिल्हाधकारी सांगली यांनी दिलेल्या सुचनांचे / नियमांचे पालन करुन कॅफे मध्ये कोणताही गैर प्रकार चालनार नाही याची दक्षता घेतली पाहिजे ज्या कॅफे चालकांनी परवाने घेतले नाहीत त्यांनी परवाने घ्यावेत, कॅफे मध्ये अल्पवयीन मुला व मुलीबाबत खात्री करावी, कॅफे चालक यांची संघटना करुन त्यामार्फत आपले प्रश्न मांडावेत, कॅफेमध्ये येणा-या प्रत्येकाची नोंद रजिस्टर मध्ये ठेवावी, कॅफे मध्ये कामकरणा-या कामगारांचे चारीत्र्य पडताळणी करुन घ्यावी, अवैध्य प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच दिलेल्या वेळचे पालन करुन सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे याबाबत सुचना दिल्या.

सदर बैठकी करीता सांगली व मिरज शहीरतील कॅफे चालक मालक तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर, श्री. आण्णासाहेब जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली, श्री. प्रणिल गिल्डा, उप विभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज, पोलीस निरीक्षक श्री. ईश्वर ओमासे विश्रामबाग पोलीस ठाणे, श्री. संजय मोरे सांगली शहर पोलीस ठाणे श्री. बयाजीराव कुरळे पोलीस निरीक्षक संजय नगर पोलीस ठाणे, प्रफुल्ल कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा सांगली असे पोलीस अधिकारी उपस्थित होते.