Sangli Samachar

The Janshakti News

ज्येष्ठ नागरिकांचा आधार बनत आहेत 'या' 8 बँका !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ मे २०२४
मुदत ठेव देशातील सर्वाधिक लोकप्रिय गुंतवणुकीपैकी एक आहे. कारण, येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. मुदत ठेवींमधून गुंतवणूकदारांना हमी परतावा मिळतो म्हणून आजही मोठ्या संख्येने लोक एफडी करतात. ज्येष्ठ नागरिकांना एफडीमध्ये गुंतवणूक करायला आवडते. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना एफडीमध्ये गुंतवणूक करायला आवडते.

बँकाही ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याज देतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही बँकांच्या ऑफर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर देत आहेत. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी आहेत.

DCB बँक ज्येष्ठ नागरिक FD

DCB बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव (FD) वर 8.6 टक्के व्याज दर देते. हा दर 25 महिने ते 26 महिन्यांच्या मॅच्युरिटी कालावधी असलेल्या FD ला लागू आहे.


IDFC बँक ज्येष्ठ नागरिक FD

IDFC फर्स्ट बँक ज्येष्ठ नागरिकांना 500 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 8.5 टक्के व्याजदर देत आहे.

बंधन बँक ज्येष्ठ नागरिक FD

बंधन बँक एका वर्षात परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8.35 टक्के व्याजदर देते.

इंडसइंड बँक ज्येष्ठ नागरिक FD

IndusInd बँक ज्येष्ठ नागरिकांना एक ते दोन वर्षांच्या कालावधीतील FD वर 8.25 टक्के व्याजदर देत आहे.

येस बँक ज्येष्ठ नागरिक FD

येस बँक 18 महिने आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के व्याज दर देते.

डीबीएस बँक इंडिया ज्येष्ठ नागरिक FD

DBS बँक इंडिया 376 दिवस ते 540 दिवसांच्या दरम्यानच्या मुदतीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के व्याजदर देते.

करूर वैश्य बँक ज्येष्ठ नागरिक FD

करूर वैश्य बँक 444 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के व्याजदर देते.

तामिळनाड मर्कंटाइल ज्येष्ठ नागरिक FD

तामिळनाड मर्कंटाइल बँक (TMB) 8 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 400 टक्के व्याजदर ऑफर करते.