Sangli Samachar

The Janshakti News

सोशल मीडियावरून हिंदू देवी-देवतांचा अपमान; मीरारोड मध्ये एकाविरुद्ध गुन्हा दाखल !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ मे २०२४
मीरा भाईंदर (Mira Bhayandar News) विभागातील नवघर पोलीस ठाण्यात एका 'अज्ञात' व्यक्तीविरुद्ध सोशल मीडियाचा वापर करून हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


गुरुवार, दि. ९ मे रोजी झालेले हे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. अब्दुल रशीद अब्दुल लतीफ असे आरोपीचे नाव असून भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम २९५ अ, १५३ अ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० नुसार कलम ६६ क आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू देवी-देवतांची छायाचित्रे वापरली आणि समाजाच्या हिंदू धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी सदर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.