Sangli Samachar

The Janshakti News

अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १६ मे २०२४
प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. आज मात्र प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत किंचित घसरली होती.

मागील 6 महिन्यांत प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांनी कमजोर झाले होते. 2024 या वर्षात प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 10 टक्के घसरले आहेत. आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी प्राज इंडस्ट्रीज स्टॉक 3.53 टक्के वाढीसह 521.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

भारत सध्या शाश्वत ऊर्जेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. भारत आपल्या ऊर्जेच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सतत स्वच्छ इंधन पर्याय शोधत आहे. भारत सध्या सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि पवन ऊर्जा यांसारख्या पर्यायी स्त्रोतांवर लक्ष केंद्रित करत आहे. यासह भारत कॉम्प्रेस्ड बायोगॅस पर्यायांची देखील पडताळणी करत आहे. त्यामुळे या क्षेत्रात एक्स्पर्ट असलेल्या प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहे.


तज्ज्ञांच्या मते, प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या कामकाजात आणि महसुलात वाढ होण्याची शक्यता आहे. प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढू शकतात. त्यामुळे तज्ञांनी प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सवर 750 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 470 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

प्राज इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः बायो-आधारित तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी इथेनॉलचा पुरवठा करणारी कंपनी आहे. ही कंपनी जैव ऊर्जा, उच्च शुद्धता पाणी, गंभीर प्रक्रिया उपकरणे, ब्रुअरीज आणि औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया संबंधित कामकाजात आघाडीवर आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.