Sangli Samachar

The Janshakti News

नोकराच्या घरात 37 कोटींची रोकड सापडल्यानंतर अखेर 'त्या' मंत्र्याला अटक; ईडीची मोठी कारवाई !



| सांगली समाचार वृत्त |
रांची - दि. १६ मे २०२४
झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने केलेल्या कारावाईबाबात मोछी अपडेट समोर आली आहे. झारखंडचे मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी 37 कोटी रुपयांची रोकड सापडली होती. याप्रकरणात आता आलमगीर आलम यांना अटक झाली आहे. या कारवाईमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

काही आठवड्यांपूर्वीच ईडीने झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात कारवाई केली होती. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली. सध्या हेमंत सोरेन हे ईडीच्या ताब्यात आहेत. अटकेआधी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर ईडीने राज्यभरात धाडसत्र सुरु ठेवले. 
6 मे रोजी काळा पैसा प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनि लॉंडरिंग अॅक्ट अर्थात पीएमएलएअंतर्गत झारखंडमध्ये सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. झारखंडचे ग्रामविकासमंत्री आलम गिर यांचे स्वीकिय सचिव असलेल्या संजीव लाल यांच्या घरी काम करणाऱ्या नोकरच्या घरावर ईडीने धाड टाकली होती. या धाडीत ईडीना मोठं घबाड सापडले. नोकऱ्याच्या घरात अनेक बॅगांमध्ये नोटांचे बंडल भरुन ठेवण्यात आले होते. 


रोकड पाहून नोटा मोजण्यासाठी मशीन मागवल्या

संजीव लाल यांच्या नोकरच्या घरात अनेक छोट्या-मोठ्या आकारांच्या बॅगांमध्ये 500-500 च्या नोटांचे बंडल भरुन ठेवण्यात आले होते. तपासादरम्यान ईडी अधिकाऱ्यांना या नोटांनी भरलेल्या बॅगा सापडल्या. सर्व रिकाम्या केल्यावर नोटांचे ढीग तयार झाले. एवढी रोकड पाहून ईडीचे अधिकारीही चक्रावले. या नोटा मोजण्यासाठी अखेरीस नोटा मोजण्याच्या मशीन मागवण्यात आल्या. अनेक तास ही नोटांची मोजदाद सुरु होती. 

ईडीने केली कसून चौकशी

नोकराच्या घरी 37 कोटींची रोकड सापडल्यानंतर ईडीने या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली. हा सारा काळ्या कमाईमधून कमावलेला पैसा असल्याचीन शंका ईडीने व्यक्त केली. हा पैसा या नोकराच्या घरी कुठून आला? त्याला एवढ्या मोठ्याप्रमाणात कॅश संभाळण्यासाठी कोणी दिली? या प्रकरणामधील खरा सुत्रधार कोण आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मंत्र्याच्या पीएलच्या नोकरला अटक झाल्यानंतर कसून चौकशी करण्यात आली अखेरीस पोलिसांनी मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली आहे.