Sangli Samachar

The Janshakti News

आधी खरेदी, मग पेमेंट; गुगल पे आणतयं 3 खास फीचर्स !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ मे २०२४
सध्या सर्वत्र ऑनलाईन पेमेंट केलं जातंय. मोबाईलच्या माध्यमातून एकेमकांना पैसे पाठवणं सोप्प झाल्याने खिशात पैसे घेऊन सहसा कोणी फिरत नाही. ऑनलाईन पेमेंट म्हंटल कि समोर पहिले नाव येत ते म्हणजे गुगल पे … गुगलपे च्या माध्यमातून अगदी काही सेकंदात आपल्याला एकमेकांना पैसे पाठवता येतात, मोबाईल रिचार्ज मारतो येतो तसेच वीजबिल सारखी अनेक बिले सुद्धा आपण घरबसल्या भरू शकतो. ग्राहकांना गुगल पे वापरत असताना आणखी सोप्प व्हावं यासाठी आता कंपनी ३ नवीन फीचर्स लाँच करण्याच्या तयारीत आहे.

यातील पहिले फिचर म्हणजे फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा पिनद्वारे कार्ड माहिती भरणे. आता Chrome आणि Android वर ऑटोफिल फीचर्ससह तुम्ही वस्तू खरेदी करताना तुमचा वेळ वाचवू शकता. हे वैशिष्ट्य तुमचा शिपिंग पत्ता, बिलिंग पत्ता आणि पेमेंट माहिती ऑटोमॅटिक भरते.आता जेव्हाही तुम्ही Chrome किंवा Android वर ऑटोफिल वापरून पेमेंट करता तेव्हा तुम्ही तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी वापरता तीच पद्धत वापरून तुम्ही तुमचे सर्व कार्ड डिटेल्स भरण्यास सक्षम असाल (फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा पिन). याचा अर्थ तुम्हाला यापुढे सुरक्षा कोड स्वतः टाकण्याची गरज नाही.


दुसरे फीचर्स म्हणजे कार्डचे फायदे सहजपणे पाहणे. तुम्हाला अनेक क्रेडिट कार्डांवर खरेदीसाठी रिवार्ड मिळतात. परंतु कोणत्या रिवार्डच्या माध्यमातून आपल्याला जास्त फायदा मिळेल हे आपल्या लक्षात येत नाही. परंतु गुगल पे च्या नवीन फीचर्स नुसार, आता पेमेंट करताना तुम्हाला तुमच्या कार्डमधून मिळणारे फायदे दिसतील.

आता तिसरं आणि महत्वाचं फिचर म्हणजे Buy now, pay later…म्हणजेच "आता खरेदी करा, नंतर पैसे द्या"… गुगल पे आता अधिक शॉपिंग वेबसाइटवर हे फीचर्स ऑफर करत आहे. कंपनीने सांगितले की, "या वर्षाच्या सुरुवातीला, आम्ही ऑनलाइन पेमेंट करताना Google Pay सोबत यापैकी काही पर्याय दाखवण्याचे टेस्टिंग सुरू केली, ज्यामध्ये Affirm आणि Zip यांचा समावेश होता.