Sangli Samachar

The Janshakti News

सांगली जिल्हा पानपट्टी असोसिएशनच्या वतीने विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२६ एप्रिल २०२४
"पानपट्टी" शहर असो वा गाव अगदी कानाकोपऱ्यात पानपट्टी ही नागरिकांचे सर्वाधिक वर्ग असलेले ठिकाण. पान अथवा तंबाखूजन्य पदार्थ घेण्यासाठी येथे अगदी तरुणापासून ते वृद्धापर्यंत व्यक्ती दिसून येतील. आणि म्हणूनच हे सर्वांचे आवडते ठिकाण.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने प्रथम सांगलीत पानपट्टी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. याला सर्वात मोठे पाठबळ मिळाले ते, स्व. मदन भाऊ पाटील यांचे. आणि म्हणूनच आपल्या व्यवसाय बंधूंच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अजित सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने सर्व सहका-यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.स्व. मदन भाऊ पाटील यांनी केलेल्या याची जाणीव ठेवून पानपट्टी असोसिएशनने आज पर्यंत सर्वच निवडणुकीत त्यांच्या पाठीशी राहिले होती. आणि आता लोकसभेचे उमेदवार विशाल भाऊ पाटील यांना तुला पानपट्टी असोशियनने जाहीर पाठिंबा दिल्याने विशाल पाटील यांचे बळ मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

विशाल दादा पाटील यांना पाठिंबाचे पत्र देत असताना पानपट्टी असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, जिल्हा कार्याध्यक्ष युसुफ जमादार, मयूर बांगर, खजिनदार राजू पागे, राजीव खोत, प्रकाश मोरे, लाल साहेब तांबोळी आदींसह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.