Sangli Samachar

The Janshakti News

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना महासंचालक सन्मान चिन्ह !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२६ एप्रिल २०२४
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना उत्तम कामगिरीसह उल्लेखनीय आणि प्रशासकीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आले आहे. राज्य पोलीस दलातील 19 वर्षे सेवा बजावणारे सध्याचे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनाही हे सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सहीने सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी अंमलदारांची नावे शुक्रवारी जाहीर करण्यात आली, यामध्ये शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे.

निरीक्षक शिंदे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आहेत दिनांक १ जुलै 2005 मध्ये ते पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर दाखल झाले त्यानंतर त्यांनी 2006 ते 2010 या काळात पुणे शहरातील कोथरूड आणि सहकार नगर पोलीस ठाण्यात सेवा बजावली. 2010 ते 2012 या काळात गडचिरोली येथे सी 60 आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सेवा बजावली. 2012 ते 2013 या काळात ते गोंदिया येथे वाहतूक विभागात कार्यरत होते 2013 ते 2014 या काळात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे आणि मिशन शाखेमध्ये कार्यरत होते. तर 2014 ते 2016 या काळात वडगाव मिठाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 2016 ते 2018 या काळात त्यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांचे वाचक म्हणूनही काम केले आहे.


2018 ते 2019 या काळात ते इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी होते 2019 ते 2021 या काळात त्यांचे निरीक्षक पदी पदोन्नती झाले त्यावेळी त्यांनी तासगाव येथील तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्रात सेवा बजावली आहे. 2021 ते 2022 या काळात त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून तर 2022 ते आज अखेर सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

2012 ते 2013 या काळात गडचिरोली येथील सेवेबद्दल खडतर सेवा पदक व विशेष सेवा फलकाने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांनी आजपर्यंतच्या सेवाकाळात अनेक किचकट प्रकरणांचा गुन्ह्यांचा छडा लावला आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी म्हणून कार्यभार घेतल्यानंतर आत्तापर्यंत तब्बल अडीचशे होऊन आधी पुण्याची उकल करण्यात या शालेय विशेषतः खून आणि दरोडेच गुन्हे उघडतील आणण्यात त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.

पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह जाहीर झाल्याबद्दल "सांगली समाचार पोर्टल"तर्फे सतीश शिंदे यांचे विशेष अभिनंदन.