Sangli Samachar

The Janshakti News

चंद्रहार पाटलांचा संयम संपला; विशाल पाटलांवर गंभीर आरोप करत म्हटले...| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२५ एप्रिल २०२४
सांगली लोकसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या लोकसभेच्या आखाड्यातील उमेदवार ठरलल्याने निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटलांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे वातावरण काहीसे तापले आहे. एकमेकांवर सत्ताधारी व विरोधक टीका करण्याची संधी सोडत नसल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. या वेळी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून लढत असलेल्या उमेदवार विशाल पाटील यांच्यवर चंद्रहार पाटलांनी सडकून टीका केली आहे.

या वेळी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील सडकून टीका करताना म्हणाले, अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे भाजपची टीम बी आहे. भाजपकडून पाकीट घेऊन पाकीट या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे. महाविकास आघाडीतून तुम्ही बाहेर पडले आहात. आपण अपक्ष उमेदवार आहात, आपण बंडखोरी केले हे अजून त्यांच्या लक्षात आले नसेल. माझी निवडणूक एकतर्फी असून, या निवडणुकीत मीच विजयी होईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

भाजप उमेदवार संजयकाका पाटलांनी या निवडणुकीत डावपेच करून स्वतःच्या विरोधात खोटा पैलवान उभा केला आहे; पण संजयकाकांना या निवडणुकीत पाडू शकणारा खरा पैलवान आता निवडणुकीत उतरला आहे, असा दावा विशाल पाटील यांनी केला होता, तर बाकीचे सगळे उमेदवार गौण आहेत, असेही विशाल पाटील म्हणाले होते.

पैलवानांनी व कुस्ती क्षेत्राने काय करावे ?

विशाल पाटील यांनी केलेल्या या त्यांच्या टीकेला चंद्रहार पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विशाल पाटील ना मातीतला ना राजकारणातील पैलवान आहे. विशाल पाटील जर स्वतःला पैलवान म्हणून घेत असतील तर आम्ही पैलवानांनी आणि कुस्ती क्षेत्राने काय करावे? असा सवाल चंद्रहार पाटील यांनी केला आहे.