Sangli Samachar

The Janshakti News

एक तास राष्ट्रवादी साठी विचार मंथन बैठक संपन्न.सांगली समाचार - दि. ६ एप्रिल २०२४
सांगली - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांनी 'एक तास राष्ट्रवादीसाठी - आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी - प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी' या उपक्रमाची संकल्पना मांडली होती. या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी, संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहुन, या बैठकीमध्ये, सामाजिक, आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्यावतीने सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब,युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या सुचनेनुसार आज एक तास राष्ट्रवादी बैठक संपन्न झाली.


बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा उमेदवाराच्या विजयाच्या अनुषंगाने बूथ कमिट्या सक्षम आणि अध्यावत ठेवणेच्या सूचना आज पदाधिकाऱ्यांना केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा सौ. संगीताताई हारगे यांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत एकजुटीने काम करणेबाबत विश्वास व्यक्त केला. तसेच विविध अन्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना आणि मते व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला सांगली शहर जिल्हाध्यक्षा सौ.संगीता हारगे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष  सागर घोडके,अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष समीर कुपवाडे, मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे, मा.नगरसेवक हरिदास पाटील,मा.नगरसेवक धनपालतात्या खोत, डॉ. छाया जाधव, शारदा माळी, आयुब बारगीर, उमर गवंडी, डॉ शुभम जाधव, अनिता पांगम, प्रियांका विचारे, विजय माळी,सुरेखा सातपुते, फिरोज, मुल्ला, नंदकुमार घाटगे, आदित्य नाईक, अज्जू पटेल,अंजर फकीर ,दत्ता पाटील, विनायक बालोलदार, कुमार वायदंडे, प्रकाश सूर्यवंशी, अभिजित रांजणे, सुभाष तोडकर, संगीता जाधव, अर्जुन कांबळे, संजय देवकुळे, विश्वास लोंढे, शीतल खाडे, सुरेखा हेगडे, जयकुमार पांढरे, आदर्श कांबळे यांच्यासह युवक, सेवादल अल्पसंख्याक, आरोग्य विभाग, कामगार सेल, समाजिक न्याय विभाग सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख पदाधिकारी तसेच प्रमुख महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.