Sangli Samachar

The Janshakti News

वह्यांची कोरी पाने पडली ७१ कोटींना!



सांगली समाचार - दि. २ एप्रिल २०२४
मुंबई - यंदाच्या शैक्षणिक वर्षात वह्यांची कोरी पाने जोडलेली एकात्मिक पाठ्यपुस्तके वितरित केली. त्यांच्या निर्मितीसाठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने (बालभारती) ७१ कोटी ४० लाख २६ हजार रुपये खर्च केल्याची बाब समोर आली. 


राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली चार भागांतील एकात्मिक पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पथदर्शी स्वरूपात उपलब्ध करून दिली. यासाठी बालभारतीने ७१ कोटी ४० लाख २६ हजार रुपये खर्च केला. 

खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडील अखर्चित १५ कोटी ४५ लाख सात हजार २३० रुपयांचा निधी वापरण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय शिक्षण विभागाकडील निधी बालभारतीला खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून देण्यास सरकारने मान्यता दिली.