Sangli Samachar

The Janshakti News

यासाठी केली, पंतप्रधान मोदींच्या विरोधात काँग्रेसने केली निवडणूक आयोगात तक्रार !


सांगली समाचार - दि ९ एप्रिल २०२४

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याची तुलना मुस्लिम लीगच्या जाहीरनाम्याशी करत पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 6 एप्रिलला राजस्थानातील अजमेर येथे निवडणूक रॅलीदरम्यान ही टीका केली आहे. त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा खोटेपणाची रद्दी असल्याचे सांगत याच्या प्रत्येक पानाला भारताचे तुकडे-तुकडे करणार असल्याच्या प्रयत्नांचा गंध येत असल्याचेही नमूद केले.

'मुस्लीम लीगचा शिक्का असलेल्या या जाहीरनाम्यात जे काही उरले होते ते डाव्यांनी ताब्यात घेतले आहे. आज काँग्रेसकडे ना तत्त्वे उरली आहेत ना धोरणे. काँग्रेसने सर्व काही आऊटसोर्स करून संपूर्ण पक्षाला आउटसोर्स केल्यासारखे वाटते असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

ते एकाच जीर्ण झालेल्या हिंदू-मुस्लिम स्क्रिप्टचा अवलंब करत आहेत

काँग्रेसने पंतप्रधानांच्या टीकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीत भाजप 180 जागांचा आकडा ओलांडण्यासाठी धडपडत आहे आणि पुन्हा त्याच जीर्ण झालेल्या हिंदू-मुस्लिम स्क्रिप्टचा अवलंब करत असल्याची भीती वाटत आहे. त्यांच्या 'वैचारिक पूर्वजांनी' स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांच्या विरोधात ब्रिटिश आणि मुस्लिम लीगला दिला पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आणि आरोप केला की त्यांच्या 'वैचारिक पूर्वजांनी' स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांच्या विरोधात ब्रिटिश आणि मुस्लिम लीगला पाठिंबा दिला होता. खर्गे यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मोदी-शहा यांच्या राजकीय आणि वैचारिक पूर्वजांनी स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश आणि मुस्लिम लीगला भारतीयांच्या विरोधात पाठिंबा दिला होता.' ते म्हणाले, 'आजही त्यांना आकांक्षा, गरजांची जाणीव नाही. मुस्लीम लीग 'काँग्रेस न्याय पत्रा'च्या विरोधात पुकारत आहे, ज्याला मार्गदर्शन आणि मागणीनुसार आकार दिला जातो.

पाच न्याय आणि 25 गॅरंटी

'GYAN' या संकल्पनेवर काँग्रेसचा जाहीरनामा आधारित आहे. G- गरीब, Y-युवा, A-अन्नदाता, N- नारी या चार मुद्द्यांवर या जाहीरनाम्यामध्ये लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात पाच महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. त्यात युवा न्याय, महिला न्याय, समता न्याय,शेतकरी न्याय आणि कामगार न्याय यांचा उल्लेख आहे. आम्ही अन्यायाच्या या भयानक काळातील अंधार दूर करू आणि भारतातील लोकांसाठी समृद्ध, न्यायाने परिपूर्ण असा सुसंवादी भविष्याचा मार्ग तयार करु, असे काँग्रेसने म्हटले आहे.
भाजप प्रचार करत असताना मोदी की गॅरंटी देत आहे. काँग्रेसने या जाहीरनाम्यामध्ये 25 गॅरंटी दिल्या आहेत. शेतकरी, मजूर, युवा, रोजगाराच्या संधी, महिला विकास याविषयीची काही आश्वासने काँग्रेसने दिली आहेत.